Jalna  Saam TV News
महाराष्ट्र

Jalna : बॉयफ्रेंडच्या घरातच १८ वर्षांच्या तरूणीचा मृतदेह आढळला, जालन्यात खळबळ

Jalna Girl Suicide Case: जालना जिल्ह्यातील फत्तेपुर गावात १८ वर्षीय शिवानी गिरी हिने आत्महत्या केली. प्रियकराच्या धमकीमुळे घटना घडल्याचा आरोप; भोकरदन पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा.

Namdeo Kumbhar

अक्षय शिंदे, जालना प्रतिनिधी

Jalna Latest News : जालनातील भोकरदन तालुक्यातील फत्तेपुर गावात १८ वर्षीय तरुणीने टोकाचा निर्णय घेतला. बॉयफ्रेंडच्या बदनामीच्या धमकीला कंटाळून शिवानी गिरी या १८ वर्षीय तरूणाने आत्महत्या केली. शिवानीचा मृतदेह तिच्या प्रियकराच्या घरी आढळल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी भोकरदन पोलिसांनी आरोपी विशाल आघाम याच्यासह पाच जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी विशाल आघाम याच्यासह ५ जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, शिवानीच्या नातेवाइकांनी हा आत्महत्या नसून तिची हत्या झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणाचा तपास भोकरदन पोलीस तीव्रतेने करत आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला असून, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. नातेवाइकांच्या आरोपांमुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT