Parbhani Rain, Student, Gangakhed saam tv
महाराष्ट्र

Parbhani News : गोदावरीत बुडून ओमनगर परिसरातील मुलाचा मृत्यू

धारखेड ते गंगाखेड गोदावरी नदीत मोठे मोठे खड्डे आहेत. खड्यामुळे येथे पाण्याचा अंदाज येत नाही.

राजेश काटकर

Parbhani Rain Update : गंगाखेड शहरा जवळ असलेल्या गोदावरी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा गंगाखेड ते धारखेड पुल परीसरात पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार रामकिशन संजय नरवाडे असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. (Maharashtra News)

ओमनगर परिसरात राहणार रामकिशन हा शहरातील गोदावरी नदीवर पोहण्यासाठी गेला. धारखेड ते गंगाखेड गोदावरी पुल परिसरात त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने ताे पाण्यात बुडाला. सहका-यांनी त्याची शाेधशाेध घेतली परंतु ताे आढळून आला नाही.

तब्बल एक तासानंतर त्याचा मृतदेह हाती लागला. यामुळे सर्वांनाच धक्का बसला. रामकिशन हा पालम तालुक्यातील केरवाडी येथे बारावीचे शिक्षण घेत होता. बुधवारी दुपारी तो गोदावरी नदीवर (river) पोहण्यासाठी गेला हाेता. परंतु ताे घरी परतलाच नाही. त्याच्या मृत्यूने कुटुंबाला माेठा धक्का बसला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SIR Update : निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! SIR प्रक्रियेसाठी मुदतवाढ; नागरिकांना दिलासा

Maharashtra Politics : संजय शिरसाट अडचणीत, मंत्रिपद धोक्यात आल्याची चर्चा, भाजपच्या नाराजीनंतर शिंदे मोठा निर्णय घेणार?

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

SCROLL FOR NEXT