Latur Crime News Saam TV
महाराष्ट्र

Latur Crime News : संतापजनक! लातूरात १४ वर्षीय मुलीवर अत्याचार; काळीमा फासणारी घटना

Latur Crime News : अल्पवयीन मुलीला लग्नाचं अमिष दाखवून एका नराधमाने तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची घटना घडली

दिपक क्षीरसागर

Latur Crime News : राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. यामध्ये अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण सर्वाधिक आहे. एकीकडे महिला अत्याचाराविरोधात कठोरात-कठोर पाऊलं उचलण्याची मागणी केली जात असताना, दुसरीकडे लातूर शहरात एक संतापजनक घटना घडली. (Latest Marathi News)

कचरा वेचणाऱ्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचं अमिष दाखवून एका नराधमाने तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची घटना घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

आरोपीने अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवत लातूर बार्शी रिंग रोडवरील पोद्दार शाळेच्या समोर असलेल्या सागवानाच्या झाडीमध्ये नेऊन 13 मार्च ते 15 मार्च दरम्यान वारंवार बलात्कार केला.

यातील पीडितेच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवला असल्याने याप्रकरणी बाललैंगिक अत्याचार अधिनियमानुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केलेला आहे. या घटनेनं परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT