14 dhavalpada zilla parishad school students hospitalised in nandurbar  SAAM TV
महाराष्ट्र

Nandurbar : नंदुरबार जिल्ह्यात 14 विद्यार्थ्यांना विषबाधा, प्रकृती स्थिर

या घटनेची माहिती कळताच पालकांना ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली.

Siddharth Latkar

- सागर निवकडे

Nandurbar News :

चंद्रजोत वनस्पतीच्या बिया खाल्ल्याने नंदुरबार जिल्ह्यातील धवल पाडा जिल्हा परिषद शाळेतील 14 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. या सर्व 14 विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. (Maharashtra News)

नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात असलेल्या धवल पाडा जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी जेवणाच्या सुट्टीनंतर शाळेच्या परिसरात खेळत हाेते. या विद्यार्थ्यांनी चंद्रज्योत या वनस्पतीच्या बिया खाल्ल्या.

त्यानंतर तेरा विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली. त्यांना उलट्या आणि जुलाब होऊ लागले. या सर्व विद्यार्थ्यांना तातडीने धडगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान सर्व 14 विद्यार्थ्यांवर धडगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या विद्यार्थ्यांची तब्येत चिंताजनक नसल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain : राज्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज, हवामान विभागाने सांगितला शब्द ना शब्द

Famous Cardiologist: प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टरची आत्महत्या; कारमध्ये आढळला मृतदेह

Thursday Horoscope : पैशाच्या समस्या दूर होतील, ५ राशींच्या व्यक्तींचे कामात बढतीचे योग; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Maharashtra Politics : मोठी बातमी! महाराष्ट्रातील ६४ नगरसेवकांवर कारवाई; ३ वर्षांसाठी अपात्र, कारण काय?

Maharashtra News Live Update: अमृत 2.0 योजनेअंतर्गत उल्हासनगरसाठी २११.०६ कोटींच्या स्वतंत्र पाणी योजनेला मंजुरी

SCROLL FOR NEXT