Beed News Saam Tv
महाराष्ट्र

Beed News : "मला आयपीएस व्हायचं होतं पण आता..." सुसाईड नोट लिहून 13 वर्षीय मुलीने जीवन संपवलं

Ashti News : बीडच्या आष्टी तालुक्यातील बीडसांगवी गावातील धक्कादायक घटना...

विनोद जिरे

Latest Beed News : मला आयपीएस व्हायचं होतं पण आता सर्व संपलं..ताईला तुमच्या सोबत घेऊन जा मी चालले अशी सुसाईड नोट लिहून आजोबा आणि मामाकडे राहणाऱ्या ऊसतोड कामगाराच्या 13 वर्षीय शाळकरी मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केलीय. ही धक्कादायक घटना बीडच्या आष्टी तालुक्यातील बीडसांगवी गावात उघडकीस आली आहे. (Latest Marathi News)

आष्टी (Ashti) तालुक्यातील कारखेल बुद्रुक येथील 13 वर्षीय मुलगी ही बीडसांगवी येथील ससे वस्तीवर आजोबा आणि मामाकडे राहत होती. आई, वडील ऊसतोडणीला जात असल्याने मामा शिक्षणासाठी तिचा सांभाळ करत होते. यादरम्यान घरातील सर्वजण शेतात काम करत असताना घरी असलेल्या दीक्षाने काल सायंकाळच्या दरम्यान घरात ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आपले जीवन संपविले. (Beed News)

तिने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईट नोट लिहिली आहे. त्यामध्ये 'मला आयपीएस व्हायचं होतं, पण आता सर्व संपलं... ताईला घेऊन जा, तुमच्या सोबत घेऊन जा मी चालले....असा मजकूर लिहिलेला आहे.

याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र या मुलीने नेमकी आत्महत्या का केली ? याचं कारण अद्याप समोर आलं नसून याविषयीचा अधिक तपास पोलीस (Police) करत आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Phone battery: प्रत्येकवेळी मोबाईल 100% चार्ज करणं योग्य आहे का?

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT