Beed Shirur Police Station
Beed Shirur Police Station Saam Tv
महाराष्ट्र

नात्याला काळिमा! जन्मदात्या बापाकडून 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार..

विनोद जिरे

बीड - जिल्ह्यात नात्याला काळिमा फासणारी घटनाघडली आहे. 36 वर्षीय जन्मदात्या नराधम बापानेच, आपल्या पोटच्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. ही संतापजनक बीडच्या (Beed) शिरूर कासार तालुक्यात घडली आहे.

13 जूनच्या मध्यरात्री आठवीच्या वर्गात शिकत असलेली पीडित मुलगी, आपल्या घरासमोरील अंगणात बाजेवर झोपली होती. यावेळी आरोपी नराधम बापाने तिला खाली झोपायला सांगितले. त्यांनतर आपल्या वडिलांनी सांगितल्याने पीडिता खाली झोपली. यावेळी मध्यरात्री 2 च्या दरम्यान बापाच्या नावाला कलंक असलेल्या नराधमाने, पोटच्या मुलीवर अत्याचार केला. यावेळी पीडितेने आरडाओरडा केल्यानंतर बाजूला झोपलेली तिची आई जागी झाली. मात्र तिला आरोपी नराधमाने जीवे मारण्याची धमकी दिल्याने ती काहीच करू शकली नाही.

हे देखील पाहा -

विशेष म्हणजे एवढ होऊनही पिडीतेच्या आईने तिला दोन दिवस पोलिसात तक्रार देऊ दिली नाही. मात्र पिडीतेच्या आज्जीने पीडितेला सोबत घेऊन शिरूर कासार पोलीस ठाणे गाठले. आणि पिडितेने आपल्यासोबत घडलेली आपबिती सांगितली.

दरम्यान, पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपी नराधम बापाविरुद्ध शिरूर कासार पोलीस ठाण्यात, बाललैंगिक अत्याचार , पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेने बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासला असून नराधम आरोपी बापाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या नराधम बापाला कठोरात कठोर शासन करावं अशी मागणी नागरीकांतून होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Constituency : पुणे शहरातील 13 दुय्यम निबंधक कार्यालये दोन दिवस राहणार बंद, जाणून घ्या कारण

Buldhana Water Crisis: बुलढाणा जिल्ह्याला दुष्काळाच्या झळा... ४६ गावांमध्ये ४७ टँकर सुरू; पाण्यासाठी नागरिकांची वणवण

Nagpur Earthquake : नागपूर शहरात भूकंपाचे सौम्य धक्के, रिश्टर स्केलवर २.५ इतकी तीव्रता; नागरिकांमध्ये घबराट

उदयनराजे भाेसलेंसाठी अजित पवार, देवेंद्र फडणवीस साता-यात; शशिकांत शिंदेंसाठी शरद पवार आज पुन्हा पावसातील सभेच्या मैदानावरुन काेणती साद घालणार?

Lok Sabha 2024 : मविआ आणि महायुतीच्या ४ प्रमुख उमेदवारांना निवडणूक आयोगाच्या नोटीसा; ४८ तासात हिशेब देण्याची सूचना

SCROLL FOR NEXT