12 districts opposes nagpur goa shaktipeeth expressway morcha at kolhapur on 18 june  Saam Digital
महाराष्ट्र

ठेकेदारांची शक्ती वाढवण्यासाठी महामार्गाचा घाट, शेतकरी आक्रमक; शक्तीपीठ महामार्ग विरोधात 18 जूनला कोल्हापुरात महामोर्चा (पाहा व्हिडिओ)

farmers opposed nagpur goa shaktipeeth expressway: नागपूर गाेवा शक्तीपीठ महामार्ग हा कोकणातील बांधा ते वर्धा असा एकूण 865 किलोमीटरचा आहे. त्यासाठी सुमारे 86 हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

नागपूर गाेवा शक्तीपीठ महामार्गास राज्यातील 12 जिल्ह्यातील शेतक-यांचा विराेध आहे. या महामार्गासाठी माेठ्या प्रमाणात शेतक-यांची जमीन जाणार असल्याने त्यास विराेध असल्याची भावना शेतक-यांनी व्यक्त केली. या महामार्ग विराेधात येत्या 18 जूनला कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर माेर्चा काढण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

या शक्तिपीठ महामार्गसाठी 12 जिल्ह्यातील 27 हजार 571 एकरांची जमीन हस्तांतरित होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार असल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरातील शेतकरी 18 जूनला महामोर्चा काढणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, काॅंग्रेस आमदार सतेज पाटील यांनी दिली.

कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी तसेच नांदेड येथील माहूरची रेणुका देवी या तीन शक्तीपीठांना जोडणारा हा महामार्ग असणार आहे. या महामार्गसाठी जमीन जाणार असल्याने त्यास शेतकरी विराेध करु लागले आहेत.

दरम्यान शक्तिपीठ महामार्गाला सर्वच स्तरातून विरोध होत आहे. शेतकऱ्यांचं या महामार्गामुळे नुकसान होणार असेल तर त्याला आम्ही विरोध करू असे काेल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Early cancer symptoms: ८० टक्के कॅन्सर पेशंट या ७ लक्षणांकडे दुर्लक्ष करतात; शरीरातील हे बदल वेळीच ओळखा

Maharashtra Live News Update: माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पत्नीचे निधन

Sunetra Pawar : मोठी बातमी! नरहरी झिरवळांवर सुनेत्रा पवारांची नाराजी, स्पष्ट शब्दातच म्हणाल्या...

PM Kisan Yojana: एक चूक अन् ₹२०००चा हप्ता थांबला, राज्यातील १.७० लाख शेतकर्‍यांना झटका; पीएम किसान योजनेबाबत अपडेट

How To Get Rid Of Dark Lips Naturally: काळे ओठ गुलाबी कसे करायचे? फॉलो करा या 3 सोप्या स्टेप्स

SCROLL FOR NEXT