koyna, koyna dam, satara news, karad news saam tv
महाराष्ट्र

Koyna Dam News : पाण्याविना कोयना धरणावरील 1000 मेगावॅट वीज निर्मितीचा चौथा टप्पा बंद

जून महिना निम्मा झाला तरी अजूनही पाऊस नसल्याने प्रमुख धरणांची पाणीपातळी कमी झाली आहे.

संभाजी थोरात

Satara News : सातारा जिल्ह्यात पावसाअभावी धरणांचा पाणीसाठा कमी हाेऊ लागला आहे. कोयना धरणात आज (शनिवार) केवळ 11 टीएमसी पाणीसाठा शिल्लक (Koyna Dam Water Storage) आहे. या धरणाची 105.25 टीएमसी साठवण क्षमता आहे. कोयना धरणात चिंताजनक पाणीसाठा उरला आहे. पाऊस आणखी लांबणीवर गेल्यास पूर्वेकडील भागाला मोठ्या पाणीटंचाईला सामना करावा लागणार आहे. दरम्यान धरणातील पाणीसाठी कमी झाल्याने कोयना धरणावरील 1000 मेगावॅट वीज निर्मितीचा चौथा टप्पा पाण्याविना बंद झाला आहे. (Maharashtra News)

जून महिन्याचे 15 दिवस संपले तरी अद्याप पावसाचे चिन्ह नाही. परिणामी सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठी दिवसेंदिवस कमी हाेऊ लागला आहे. पावसाअभावी जूलै महिन्यात जिल्ह्यात नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची चिन्ह निर्माण झाले आहे. सातारा शहरात तर पालिकेने नागरिकांना पाण्याचा तुटवडा भासू नये यासाठी पाणी पूरवठ्यात कपात केली आहे.

वीजनिर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या कोयना (Koyna Hydroelectric Project) धरणात (Koyna Dam) अल्प पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. धरण व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनूसार आज (शनिवार) काेयना धरणात 11 टीएमसी पाणीसाठी शिल्लक आहे. सिंचनासाठी कोयना धरणातून १०५०, धोम धरणातून ५९९, धोम-बलकवडी २५, कण्हेर ४३०, उरमोडी धरणातून १२०० क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशीसाठी श्री विठ्ठल-रुक्मिणीला मुख्यमंत्र्यांकडून खास पोशाख | VIDEO

Bhandara News : नवं घर बांधल्याचा आनंद गगनात मावेना! रोज नव्या घरी झोपायला जायचे, एका रात्री आक्रित घडलं अन्...

Maharashtra Live News Update: अहिल्यानगरातील महात्मा फुले चौकात भीषण अपघात

Uttar Pradesh Heartbreaking : शाळेचा पहिला दिवस, कारमधून उतरला अन् धाडकन जमिनीवर कोसळला; १२ वर्षाच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Nilesh Sable: निलेश साबळेला 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमातून का हटवलं, जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT