Mahableshwar Accident News, Buldhana, Akola, Satara, Hospital, CM Eknath Shinde saam tv
महाराष्ट्र

Mahableshwar: तीनशे फुट दरीत ट्रक काेसळल्याने अकरा चिमकुल्यांसह महिला भेदरल्या; अपघातग्रस्त निघाले हाेते मुख्यमंत्र्यांच्या गावी

सुमारे तीनशे फुट खाेल दरीत वाहन काेसळल्याने महाबळेश्वरच्या द-यातून किंचाळ्यांचा आवाज आला.

Siddharth Latkar

Mahableshwar Accident Latest Updates : महाबळेश्वरातील मुकदेव घाटात आज (शनिवार) सकाळच्या प्रहरी झालेल्या अपघातामधील मजूर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या दरे तांब (Dare Tamb Village) या गावी रस्त्याचे काम करण्यासाठी निघाले हाेते अशी माहिती समाेर आली आहे. हा अपघात (accident) झाल्यानंतर स्थानिक अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धावले. या अपघाताची (accident) झळ अकरा लहान मुलांना, दहा महिला तसेच आठ पुरुषांना बसली आहे.

या अपघाताबाबत जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनूसार आज सकाळी दरे तांब (तालूका महाबळेश्वर) या ठिकाणी काम करण्यासाठी पुणे चाकण येथून येत हाेते. बुरडाणी घाटात वाहन चालक प्रदीप खंडू कुरदने (वय 23) यांना वाहनाचा ब्रेक फेल झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे चालकाने प्रसंगावधान राखत वाहन कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला परंतु ताेपर्यंत वेळ निघून गेली हाेती.

वाहन सुमारे तीनशे फूट खोल दरीत कोसळले. याच घाटामधून तळदेव येथील स्थानिक लोक प्रवास करत असताना त्यांना वाहन दरीत गेल्याचे लक्षात आले. त्यांनी त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्र तळदेव येथे माहिती दिली. प्राथमिक आरोग्य केंद्र तळदेव व तापोळा यांच्या तीन रुग्णवाहिका व कर्मचारी घटनास्थळी पाेहचले.

अपघातग्रस्तांना ग्रामस्थांनी जमेल तसे दरीतून बाहेर काढले. रुग्णवाहिका, ग्रामस्थांच्या वाहनातून जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्र (तळदेव) येथे आणले. या अपघाताची झळ (injured) अकरा लहान मुलांना, दहा महिलांना तसेच आठ पुरुषांना बसली. दरम्यान त्यांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांच्यावर तेथेच उपचार सुरु आहेत.

या अपघातात ज्यांची प्रकृती जाेखमीची व अति जाेखमेची आहे अशांना प्राथमिक उपचार देऊन महाबळेश्वरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. यामध्ये एकूण अकरा लोकांना पाठविण्यात आले आहे. यामध्ये दाेन गर्भवती माता असल्याचे देखील नमूद करण्यात आले आहे. (Maharashtra News)

या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्यांना सातारा (satara) येथील जिल्हा रुग्णालयात आणण्यात येत आहे. त्यात दोन लहान मुलांचा समावेश आहे. तसेच एक महिला व एक पुरुषाचा समावेश असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

दरम्यान सर्व अपघातग्रस्तांना ग्रामस्थांसह, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी दिलासा देत काळजी करु नका असा धीर देत आहेत. परंतु लहान मुले भेदरेली असल्याने त्यांच्या पालकांचा जीव वर खालीवर हाेत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावाला कामासाठी निघालेले या अपघातग्रस्तांची सर्वांकडून आस्थेवाईकपणे चाैकशी केली जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज्यसभेच्या जागेसाठी नवनीत राणांचे प्रयत्न? मुख्यमंत्री भेटीमुळे चर्चांना उधाण

Mangalsutra Paan Design: वटपोर्णिमेसाठी ट्राय करा पानाचे सुंदर मंगळसूत्र, पाहा या ७ ट्रेंडी डिझाइन्स

Crime: अमरावती हादरले! बहिणीची छेड काढणाऱ्याला जाब विचारला, भरचौकात धारदार शस्त्राने वार करत तरुणाला जागीच संपवलं

Vidhan Parishad Election: राज्यभरात विधानपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी; कुठे बिनविरोध, कुठे होणार लढत

Monsoon Update 2026 : मान्सून सर्वात शेवटी कोणत्या राज्यात पोहोचतो? कारण जाणून घ्या

SCROLL FOR NEXT