Wardha SaamTv
महाराष्ट्र

10-Year-Old-Girl-Molested In Maharashtra : दहा वर्षाच्या मुलीवर तिघांचा सामुहिक अत्याचार

पाेलिस या घटनेचा तपास करीत आहेत.

साम न्यूज नेटवर्क

- चेतन व्यास

एकीकडे देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहाेत. तर दुसरीकडे महिला व मुलींवरील अत्याचाराच्या घटना दररोज घडताना दिसत आहेत. अशीच एक संतापजनक घटना सावंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. अवघ्या १० वर्षीय मुलीवर तिघांनी सामुहिक अत्याचार केला. त्यामुळे वर्धा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. (Maharashtra News)

सावंगी पोलिसांना घटनेची माहिती समजताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तीन अल्पवयीने (विधीसंघर्षित) मुलांना ताब्यात घेतले. त्यांना बाल न्याय मंडळापुढे हजर करणार असल्याचे पोलिस निरीक्षक धनाजी जळक यांनी साम टीव्हीशी बाेलताना सांगितले.

सावंगी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता ही घरासमोरील अंगणात खेळत असताना तिच्याच घरा शेजारी राहणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांनी पीडितेला बळजबरीने घरामागील असलेल्या तलावाकडे खेचत नेले. तेथील झाडाझुडपांत तिच्यावर सामुहिक अत्याचार केला.

पीडितेने ही बाब तिच्या कुटुबातील लाेकांना सांगितली. त्यावेळी कुटुंबियांच्या पाया खालची वाळू सरकली. कुटुंबियांनी थेट सावंगी पोलिस ठाणे गाठले. त्यांनी घडलेली सर्व हकीकत पाेलिसांना सांगितली. पाेलिसांनी पीडितेच्या आईच्या तक्रारीवरुन तिन्ही मुलांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस निरीक्षक धनाजी जळक म्हणाले तिन्ही मुले अल्पवयीन आहेत. त्यांच्यावर कलम ३६३,३७६, (एबी),३७६(२)(एन),३७६ (ड) भादवी सहकलम ४,६ लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तिन्ही मुलांना ताब्यात घेतले आहे असे जळक यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT