Pik Vima 
महाराष्ट्र

Pik Vima : 1 रुपयात पीकविमा बंद होणार? कृषीमंत्र्यांचे संकेत, शेतकऱ्याला टेंशन?

Agro News Update : पीक विमा योजनेत घोटाळा झाल्याचं समोर आल्यानंतर आता 1 रुपयात पीक विमा योजना बंद होणार अशी चर्चा रंगली होती.. त्यामुळे बळीराजा संभ्रमात होता..

Bharat Mohalkar

Agro News : 1 रुपयात पीक विमा देण्याची योजना सरकारने आणली होती.. मात्र आता हीच महत्वाकांक्षी योजना बंद करण्याचे संकेत कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी दिलेत.. कोकाटे नेमकं काय म्हणाले आहेत आणि 1 रुपयाच्या पीक विम्याआधी विम्याचा हप्ता किती होता? यावरचा हा विशेष रिपोर्ट....

पीक विमा योजनेत घोटाळा झाल्याचं समोर आल्यानंतर आता 1 रुपयात पीक विमा योजना बंद होणार अशी चर्चा रंगली होती.. त्यामुळे बळीराजा संभ्रमात होता.. मात्र आता कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंनीच 1 रुपयात पीक विमा बंद करण्याचे संकेत दिलेत...काही शेतकऱ्यांना 100 रुपये तर काही शेतकऱ्यांना 1 रुपया, असं करता येणार नसल्याचं कृषीमंत्र्यांनी स्पष्ट केलं. आता पिकांनुसार विम्याचा हप्ता ठरवणार असल्याचे संकेत कृषीमंत्र्यांनी दिलेत.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना महायुती सरकारने 1 रुपयात पीक विमा योजना जाहीर केली होती. 1 रुपयाच्या वरील रक्कम सरकार भरत होते.. ही योजना बीड जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर राबवण्यात आली होती... त्यानंतर ही योजना राज्यभर राबवण्यात आली.. मात्र 1 रुपयात पीक विमा योजनेआधी कोणत्या पीकाला विम्याचा हप्ता किती होता? पाहूयात...

जुन्या योजनेत पीकविमा हप्ता किती?

ज्वारी- 630 रू.

सोयाबीन- 520 रू.

कापूस- 3500 रू.

फळबाग- 19000 रू

पीक विमा योजनेतील गैरप्रकार आणि लाडकी बहीणसह इतर योजनांमुळे तिजोरीवर येणारा ताण लक्षात घेऊन सरकार योजनेला कात्री लावण्याच्या तयारीत आहे.. त्यामुळे सरकार पीकांच्या पॅटर्ननुसार योजना राबवणार की यात वेगळ्याच सुधारणा करणार? याकडे लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Curd Health Effects: दहीसोबत हे ५ पदार्थ कधीही खाऊ नका

Astrology Tips: ११ मुखी रुद्राक्ष कोणाला घालावे आणि त्याचे आध्यात्मिक फायदे कोणते? वाचा सविस्तर

HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! ४ नियमांत केले मोठे बदल; तुमचा खिसा रिकामा होणार

Maharashtra Live News Update: पालघरच्या पूर्व आणि पश्चिम भागात मुसळधार पावसाला सुरुवात

Spruha Joshi: स्पृहा जोशीचं सुंदर सौंदर्य पाहून मन होईल घायाळ

SCROLL FOR NEXT