Sambhaji Bhide Controversial Statement saam tv
महाराष्ट्र

Sambahji Bhide Controversy : संभाजी भिडेंची मिशी कापणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस, समता परिषदेच्या माजी जिल्हाध्यक्षांची घोषणा

Samata Parishad : समता परिषदेचे माजी जालना जिल्हाध्यक्ष नवनाथ वाघमारे यांनी तर संभाजी भिडेंची मिशी कापणाऱ्याला बक्षीस जाहीर केलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

लक्ष्मण सोळुंके, नवनीत तापडिया

Jalna News : सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करणारे शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे पुन्हा एकदा बरळले आहेत. महात्मा गांधी आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने वातावरण चांगलं आहे. संभाजी भिडेंवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसने आधीच केली आहे. तर काँग्रेस नेते यांनी पृथ्वीराज चव्हाण यांनीही संभाजी भिडेंवर गंभीर आरोप केले आहेत.

समता परिषदेचे माजी जालना जिल्हाध्यक्ष नवनाथ वाघमारे यांनी तर संभाजी भिडेंची मिशी कापणाऱ्याला बक्षीस जाहीर केलं आहे. संभाजी भिडे यांनी देशात अशांतता पसरवण्याचं काम सुरु केलं आहे. भिडे हे महापुरुषांबाबत दररोज वेगवेगळे वक्तव्य करत आहेत. त्यामुळे भिडेंची मिशी कापणाऱ्याला ओबीसी समाजाकडून वर्गणी करून एक लाखांचं बक्षिस देण्याची घोषणा नवनाथ वाघमारे यांनी केली आहे. (Maharashtra News)

संभाजी भिडेंना अटक करा

संभाजी भिडे हे उद्या छत्रपती संभाजीनगर शहरात येत आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आज पोलीस आयुक्तांची भेट घेत घेत, निवेदन देत त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. (Latest News)

तसेच शहरातील त्यांच्या कुठल्याही कार्यक्रमाला परवानगी देऊ नये, जर भिडेंच्या उद्याच्या शहरातील कार्यक्रमाला परवानगी दिली तर महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या वतीने तो कार्यक्रम हाणून पाडण्यात येईल, असा इशारा महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आलेला आहे.

तसेच जर उद्या संभाजी भिडे शहरात आलेच तर ते वापस कसे जातील हे बघूच असा इशारा देखील शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे. या शिष्टमंडळामध्ये काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TCS Layoffs: TCSमध्ये 30 हजार नोकरकपात? आयटी कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचं सावट

Nilesh Ghaywal : खाकीचा खुळखुळा, गँगस्टर पळाला; निलेश घायवळला पळवणारे पुणे पोलिसांमध्ये कोण? VIDEO

Black Pepper : दररोज काळीमिरी खाल्ल्याने आरोग्याला होतात 'हे' भन्नाट फायदे

Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील हल्ला खोटा? अहवालात नेमकं काय?

Face Care Tips: ग्लोइंग त्वचेसाठी बेसन आणि हळदीचा पॅक लावताय? थांबा, होतील 'हे' दुष्परिणाम

SCROLL FOR NEXT