Money Stolen From Car, Nagpur saam tv
महाराष्ट्र

RS 1 Crore 97 Lakh Stolen : कारमधून एक काेटी 97 लाखांची बॅग लंपास; जाणून घ्या नेमकं काय घडलं

पाेलिस घटनेचा तपास करीत आहेत.

मंगेश मोहिते

Nagpur Crime News : कारच्या (car) खिडकीच्या काचा तोडून त्यातील तबबल एक कोटी 97 लाख रुपयांची चाेरी (theft) केल्याची घटना नागपूर (nagpur) येथे घडली आहे. या घटनेचा तपास काेतवाली पाेलीस (kotwali police) करीत आहेत. (Breaking Marathi News)

गोरख भामरे (पोलिस उपायुक्त) यांनी ही घटना (nagpur) गणेश पेठ परिसरात (ganesh peth area) दाेन फेब्रुवारीला मध्यरात्रीच्या सुमारास घडली असे सांगितले. अनिल दशरथ व्यास यांनी याबाबत पाेलिसांत तक्रार नाेंदवली आहे. व्यास हे सध्या कोतवाली येथील गणेश नगर परिसरात राहतात.

मुंबईच्या (mumbai) जयेश चव्हाण यांची नवनीत इंटरप्राईजेस नावाने कुरिअर कंपनी आहे. दाेन फेब्रुवारीला नवनीत एंटरप्राइजेसच्या कर्मचाऱ्यांनी शहरातील विविध व्यवसाय प्रतिष्ठानमध्ये जाऊन एक कोटी 97 लाख रुपये जमा केले. संपूर्ण पैसे एका बॅगेत ठेवले होते.

रात्री पैशाची बॅग इमारतीच्या पार्किंगमध्ये उभ्या कारमध्ये ठेवण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी पार्किंगमध्ये ठेवण्यात आलेली कारच्या डाव्या बाजूची काच फुटलेली होती. पैशाची बॅक कारमध्ये नव्हती. त्यामुळे व्यास यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गडचिरोलीत पेट्रोल-डिझेलचा तुटवडा; अनेक पंपांवर ‘No Petrol, No Diesel’चे फलक

Crime News: महाराष्ट्र हादरला!२ मित्रांनी केला घात, लॉजवर नेऊन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य; मारहाण करत...

Navratri Vastu Tips: नवरात्रीत घरातील 'या' ७ गोष्टी चुकूनही रिकाम्या ठेवू नका; जाणून घ्या वास्तुशास्त्रातील मान्यता

Pre wedding shoot Locations: परदेशात जाण्याची गरज नाही! भारतातील 5 सुंदर - रोमँटिक ठिकाणे; प्री-वेडिंग शूटसाठी ठरतील बेस्ट

DA Hike : महागाई भत्त्यात वाढ; लाखो कामगारांच्या बेसिक सॅलरीतही वाढ, ऑक्टोबरपासून नवे दर लागू

SCROLL FOR NEXT