महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी आज सकाळपासून प्रत्येक भागात मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यातील 36 जिल्ह्यांमधील 288 विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रिया पार पडत आहेत. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून अगदी सामान्यांपासून, अनेक मोठे कलाकार, नेते मंडळी सगळ्यांनी मतदानाला सुरुवात केली आहे.
मतदानाला तासाभरापुर्वी सुरुवात झाली असतानाच अभिनेता सुबोध भावे यांनी बजावला मतदान हक्क बजावला आहे. सुबोध भावाने नेहमी प्रमाणे सकाळीच मतदान केले आहे. सुबोधने कसबा येथे जावून त्याचा मतदानाचा हक्क बजावला आहे. कसबा येथे असलेल्या गुजराती प्रायमरी शाळेत त्याने मतदान केले आहे. मतदान केल्यावर सुबोध भावेने एक मोठी तक्रार केली आहे.
महाराष्ट्रात विधानसेभेच्या मतदानाचा हक्क बजावल्यानंतर सुबोध भावेने माध्यमांसोबत संवाद साधला आहे. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर सुबोध भावेने वृत्तसंस्थेसोबत संवाद साधताना खूप मोठी तक्रार केली. सुबोध भावे म्हणाला, 'आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. सर्वांनी घराबाहेर पडून मतदान करावे. पुणे-मुंबईत खूप कमी मतदान केलं जातं. याचा अर्ध तुम्ही बोलण्याचा अधिकार गमावता. मी कोणत्याही कामात कितीही व्यस्त असलो तरी मतदान हक्क बजावण्यासाठी पुण्यात येतो.' असे सुबोध भावेने मतदारांना आवाहन केले आहे.
मतदान जर नाही केलं तर तुम्हाला काही बोलण्याचा अधिकार तुम्ही गमावून बसता असे सुबोध भावेने वृत्तसंस्थेला सांगितले आहे. मतदान खूप महत्वाचे आहे. तसेच मतदान करण्याचा प्रत्येक भारतीय नागरिकाचा हक्क आहे. असे सुबोध भावेचे म्हणणे आहे.
पुढे सुबोध म्हणाला, 'पाच वर्षांनी येणाऱ्या निवडणुका पाच वर्षांनीच हव्यात. तर महानगरपालिकेच्या निवडणुका लवकर घेतल्या पाहिजेत. हे सगळं असताना अडीच अडीच वर्षांनी सरकार बदलू नये. सरकारने महिला शेतकरी यांच्याकडे लक्ष द्यावे. त्यांच्यासाठी उद्योग आणावेत.' असे सुबोध भावेने पुण्यातल्या मतदान केंद्रावर वृत्तसंस्थेशी संवाद साधताना सांगितले आहे. हे सगळे म्हणून झाल्यावर सुबोधने एक मोठे विधान केले ते म्हणजे, 'मी कुठल्याही पक्षाचा नाही मला त्यात आणू नका.' असे म्हणून त्याने संवाद संपवला.
Edited By: Sakshi Jadhav