Sambhaji Raje Chhatrapati Saam TV
Maharashtra Assembly Elections

Sambhaji Raje Chhatrapati : उमेदवार पाडण्यापेक्षा..; निवडणूक जाहीर होताच संभाजीराजेंचा जरांगेंना सल्ला

Assembly Election : मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार कसे निवडून येतील याकडे लक्ष दिलं पाहिजे असा सल्ला संभाजीराजे छत्रपती यांनी दिलाय.

Bharat Jadhav

मनोज जरांगे यांनी उमेदवार पाडण्यापेक्षा आपण उमेदवार कसा निवडून आणू शकतो हा अँगल असावा, असा सल्ला संभाजीराजे छत्रपती यांनी दिलाय. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते, त्यावेळी त्यांनी असे विधान केले आहे.

विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याआधी छत्रपती संभाजी राजे यांनी बच्चू कडूंसोबत हात मिळवणी करत तिसरी आघाडी स्थापन केली. परिवर्तन महाशक्ती नावाची तिसरी आघाडी स्थापन करत त्यांनी महायुतीला आणि महाविकास आघाडीला आव्हान दिलंय. त्यांच्या आघाडीत मनोज जरांगे यांनी सहभागी व्हावे, अशी साद संभाजीराजे छत्रपती यांनी घेतली होती.

दरम्यान आज निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकाच्या तारखा जाहीर होताच मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतलीय. आचारसंहिता लागू होण्याआधी सरकारने मराठा आरक्षणाविषयी निर्णय घेतला नसल्याने मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर आणि देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. कोणाच्या जागा वाढवायचा,की पाडायच्या ते आम्ही ठरवणार आहे, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतलीय.

त्यांच्या त्या भूमिकेवरून छत्रपती संभाजी राजे यांनी एक सुचक सल्ला दिलाय. बच्चू कडू आणि संभाजी राजे यांनी स्थापन केलेल्या तिसऱ्या आघाडीत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सहभागी व्हावे, अशी साद घालण्यात आली होती. आज पुन्हा संभाजी राजे यांनी त्यांना सहभागी होण्याचं आवाहन केलंय.

काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती

तुम्हाला स्वतंत्र जायचं असेल तरी तुम्ही जा, पण उमेदवार पाडण्यापेक्षा उमेदवार निवडून कसा आणता, येईल यावर तुम्ही लक्ष केंद्रित करा. असा वडीलच्या नात्याने जरांगे पाटील यांना माझा सल्ला असल्याचं संभाजी राजे म्हणालेत. राजकारणात यायचं असेल तर अनेक समीकरणे असतात. आपापल्या पद्धतीने प्रत्येक जण हे समीकरण प्लॅन करत असतात. निवडणुकीला सामोरे जाताना सर्वच बहुजन घटकातील लोक सोबत घेणं हा राजकारणाचा भाग असल्याचंही छत्रपती संभाजी राजे म्हणाले.

एक सुसंस्कृत पर्याय

आमची तिसरी आघाडी नाही तर एक सुसंस्कृत पर्याय म्हणून आम्ही पुढे येतोय . मागील 75 वर्षात विषय तेच मुद्दे तेच, तेच पुढारी. आणि अजेंडा ही तोच आहे. लोकदेखील आता व्यतीत झालेत 75 वर्षात अगदी खालच्या पातळीवरच राजकारण जर कुठे झालं असेल तर ते आत्ता 2024 मध्ये महाराष्ट्रात झालंय.

इतकं फोडाफोडीचे राजकारण, इकडून उडी तिकडून उडी मारणं. दररोज आपण पाहतोय खालच्या पद्धतीची टीका सुरू आहे. म्हणून एक सुसंस्कृत पर्याय आणि एक सक्षम पर्याय म्हणून परिवर्तन महाशक्तीकडे लोक आता बघायला लागले असल्याचा दावा छत्रपती संभाजी राजे यांनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT