Nashik Madhya Assembly Constituency Saam Tv
Maharashtra Assembly Elections

Saam Exit Poll : नाशिक मध्यमध्ये देवयानी फरांदे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Nashik Madhya Assembly Constituency, Maharashtra Exit Poll : सकाळच्या एक्झिट पोलनुसार, भाजपच्या देवयानी फरांदे हे नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या संभाव्य उमेदवार होऊ शकतात.

Priya More

Nashik Madhya Assembly Election: नाशिक मध्य मतदारसंघात भाजपचं पारडं जड दिसतंय. त्यामुळे इथले संभाव्य आमदार कोण होणार आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. २० नोव्हेंबरला या मतदारसंघाचा उमेदवार जाहीर होईल. पण त्यापूर्वी सकाळचा एक्झिट पोल समोर आला आहे. सकाळच्या एक्झिट पोलनुसार, भाजपच्या देवयानी फरांदे हे नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या संभाव्य उमेदवार होऊ शकतात.

देवयानी फरांदे या शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार वसंत गिते यांचा पराभव करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. देवयानी फरांदे यांना वसंत गिते यांनी तगडं आव्हान दिलं होतं. पण मतदारांनी देवयानी फरांदे यांना कौल दिला आहे. वसंत गिते मनसेमधून ठाकरे गटामध्ये आले होते. त्यामुळे ठाकरे गटामध्ये नाराजी होती. देवयानी फरांदे यांनी सर्व आव्हान स्वीकारले होते.

नाशिक मध्य हिंदू आणि मुस्लिम बहुल असा समिश्र मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये दोन टर्म देवयानी फरांदे आमदार होत्या. पण या मतदारसंघामध्ये ठाकरे गटाच्या वसंत गिते यांनी तगडं आव्हान फरांदेंसमोर उभं केलं होतं. देवयानी फरांदे यांच्यावर ठाकरे गटाने अनेक आरोप केले होते.

लोकसभेत मुस्लिम मतं महाविकास आघाडीला पडली होती. पण यावेळी ती उणीव भरून काढण्यासाठी भाजप आणि हिंदुत्ववादी संघटना मैदानात उतल्या होत्या. या मतदारसंघात मतदानाची टक्केवारी देखील यावेळी वाढली आहे. लाडक्या बहिणीचा इफेक्ट इथे पाहायला मिळत आहे. हिंदुंची मतं वाढली आहेत. याचा फायदा महायुतीला आणि देवयानी फरांदेला होईल. त्यामुळे देवयानी आमदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT