Kopri-Pachpakkhadi saam tv
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Exit Poll: कोपरी-पाचपखाडी मतदारसंघातून एकनाथ शिंदे होणार आमदार? पाहा Exit Poll

Kopri-Pachpakhadi Vidhansabha Election Exit Poll Result: ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला असून शिवसेना पक्षातील 40 आमदार फोडून सत्ता स्थापन केल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरलेत.

Surabhi Jayashree Jagdish

महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक पार पडली असून २० तारखेला मतदान झालं आहे. यानंतर आता उद्या म्हणजेच शनिवारी या निवडणूकीचा महानिकाल लागणार आहे. उद्या मतमोजणी होणार असून यावेळी कोणाची सत्ता येणार? कोण निवडून येणार, कोण पडणार? याचं चित्र स्पष्ट होणार आहे.

ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला असून शिवसेना पक्षातील 40 आमदार फोडून सत्ता स्थापन केल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरलेत. यामध्ये खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा या निवडणुकीत कस लागणार आहे, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महायुतीच्या शिवसेनेकडून एकनाथ शिंदे कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून या ठिकाणी संभाव्य आमदार कोण आहे, हे पाहूयात.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्याने ती प्रचंड प्रतिष्ठेची मानली जातेय. कोपरी-पाचपाखाडी विधानसभा राखणं हे एकनाथ शिंदेसाठी फार महत्त्वाचं असून सामच्या एक्झिट पोलमध्ये एकनाथ शिंदे संभाव्य आमदार असल्याचं समजतंय.

एकनाथ शिंदे यांच्यासमोर ठाण्यातील आनंद दिघे यांना मानणाऱ्या शिवसैनिकांसाठी ठाकरे गटाने शिंदेंना केदार दिघे यांचं आव्हान दिलंय. त्यामुळे ही लढत फार चुरशीची होणार असल्याचं चित्र आहे. मात्र एक्झिट पोलमधून तरी एकनाथ शिंदे यांचं पारड जड वाटतंय.

टिप: सकाळ समूहाच्या सर्व्हेतून एक्झिट पोलचे अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत. ही फक्त प्राथमिक आकडेवारी आहे. २३ तारखेला राज्यात कुणाचं सरकार स्थापन होणार, याचं चित्र स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT