Akkalkot Assembly Saamtv
Maharashtra Assembly Elections

Exit Poll Maharashtra : अक्कलकोटमधून सचिन कल्याणशेट्टी पुन्हा आमदार? पाहा एक्झिट पोल

Akkalkot Assembly Constituency, SAAM Exit Poll: विधानसभा निवडणुकीनंतर अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात भाजप सत्ता स्थापन करेल असं दिसून येत आहे. सकाळच्या एक्झिट पोलमधून ही संभाव्य आकडेवारी समोर आली आहे.

Saam Tv

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात भाजप सत्ता स्थापन करेल असं दिसून येत आहे. सकाळच्या एक्झिट पोलमधून ही संभाव्य आकडेवारी समोर आली आहे. यात पुन्हा एकदा भाजपचे सचिन कल्याणशेट्टी हे विजयी होणार असल्याचं दिसत आहे. त्यामुळे अक्कलकोट मतदारसंघात संभाव्य आमदार म्हणून सचिन कल्याणशेट्टी यांना मतदारांची पसंती मिळत आहे.

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध कॉंग्रेस अशी लढत आहे. भाजपकडून विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना याठिकाणी उमेदवारी मिळाली होती. तर कॉंग्रेसकडून माजी गृह राज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांना निवडणूक रिंगणात उतरवण्यात आलं होतं.

काल विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. त्यानंतर या ठिकाणच्या जनतेचा कौल कोणाला जाणार याबाबत सकाळच्या एक्झिट पोलमधून माहीती समोर आली आहे. विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनाच पुन्हा संभाव्य आमदार म्हणून पसंती मिळण्याची शक्यता असल्याने भाजपची सरशी होताना दिसत आहे.

2014 मध्ये ही जागा कॉंग्रेसने जिंकली होती. त्यानंतर 2019मध्ये भाजपने या जागेवर पुन्हा आपला झेंडा रोवला होता. आता यावेळी देखील पुन्हा भाजपला मतदार पसंती देतील असा अंदाज आहे. सचिन कल्याणशेट्टी यांनी केलेल्या विकासकामामुळे आणि मतदारसंघातील प्रत्येक गावात दिलेल्या निधीमुळे त्यांना याठिकाणी पसंती मिळत आहे.

उजणीचा पाणी प्रश्न देखील त्यांच्या काळात सुटत असताना दिसून आला आहे. त्याचबरोबर स्वामी समर्थांच्या तीर्थक्षेत्राचा प्रश्न देखील मार्गी लागला आहे. अशा अनेक कारणांचा फायदा सचिन कल्याणशेट्टी यांना होणार आहे. मात्र हिंदू मुस्लिम ध्रुवीकरणाचा फटका कुठेतरी त्यांना बसेल, असंही चित्र आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

SCROLL FOR NEXT