Assembly Election 
Maharashtra Assembly Elections

Assembly Election: माहीममध्ये निवडणुकीच्या मैदानात पुन्हा सरवणकर; होणार चुरशीची तिरंगी लढत

Assembly Election: राज्यातल्या चुरशीच्या लढतीत माहिम मतदारसंघाचा समावेश आहे. शिंदे गटाचे सदा सरवणकर आपल्या उमेदवारीवर शेवटपर्यंत ठाम राहिले आहेत. त्यामुळे मनसेची अडचण झाली आहे. मात्र भाजपनं मनसेचे उमेदवार अमित ठाकरेंना पाठिंबा दिल्यानं सरवणकरांसाठीही लढाई सोपी नाही. पाहूया एक रिपोर्ट.

Girish Nikam

साऱ्या राज्याचं लक्ष लागलेल्या माहीमच्या मैदानात सरवणकरांनी आपली उमेदवारी कायम ठेवलीय. त्यामुळे आता माहीमचा सामना तिंरगी होणार आहे. राज ठाकरेंचा मुलगा अमित पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे सदा सरवणकरांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी महायुतीनं जोरदार प्रयत्न केले होते. मात्र आमदार आणि वशिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकरांनी सर्वांची मागणी धुडकावून लावली. एवढंच नव्हे तर माहीमच्या समीकरणात अमित ठाकरे निवडून येणं अवघड असल्याचा दावाही केला.

विशेष म्हणजे सरवणकरांनीच राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी थेट शिवतीर्थ गाठलं. मात्र राज ठाकरेंनी भेट नाकारली. तर हाकेच्या अंतरावर असलेल्या सरवणकरांनी भेट घेण्यासाठी एवढे दिवस का लावले? असा सवाल करत हा स्टंट असल्याचा आरोप मनसेनं केलाय. माहिम मतदारसंघातून सदा सरवणकरांनी आत्तापर्यत तीन वेळा विधानसभा निवडणुकीत विजय मिळविला आहे. 2004, 2014 आणि 2019मध्ये त्यांना माहीमचा गड राखलाय.

2024 च्या विधानसभेला माहिमध्ये तिरंगी लढत होणार आहे. चार दशके जनतेसाठी दिलीस राजपुत्रासाठी माघार घेऊ नकोस तू, असे बाळासाहेब ठाकरेंचा फोटो असलेले बॅनर माहिमध्ये झळकले आहेत. तर अमित ठाकरेंनी घरोघरी जाऊन आपला प्रचार सुरु केला आहे. माहिमची जनता आता अनुभवी सरवणकरांच्या पाठिशी उभं राहून त्यांच्या विजयाची हॅटट्रीक करणार की नव्या दमाच्या राजपुत्राला संधी देणार याची उत्सुकता आहे. ठाकरे गटाचे महेश सावंत यांचीही या मतदारसंघात ताकद असल्यानं तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार आणि माहिमचा विजयाचा हलवा कोण खाणार ? याकडे सर्वांचं लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna Police : दारूची अवैध तस्करी; जालना पोलिसांची कारवाई, आठ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

Box Office Collection: कांताराची दिवाळीत बंपर कमाई; लवकरच पार करणार ६०० कोटींचा टप्पा

Sachin Pilgaonkar : महागुरू सचिनचा नवा दावा, माझं गाणं 'त्यांनी' ऐकलं अन् अखेरचा श्वास घेतला

Washim : गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक; १२ किलो गांजा जप्त

Sai Tamhankar Photos: खोल गळ्याच्या ब्लाऊजमध्ये सईचं खुललं सौंदर्य, फोटो तुम्हालाही आवडतील

SCROLL FOR NEXT