Shahuvadi Assembly SaamTv
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Exit Poll : शाहूवाडी मतदारसंघात जनसुराज्य शक्तीचा विजय? पाहा Exit Poll

Saam Exit Poll, Shahuvadi Assembly : शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात जनसुराज्य शक्ती आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात लढत रंगली आहे. यात संभाव्य आमदार म्हणून विनय कोरे यांच्या नावाला पसंती मिळत आहे.

Saam Tv

शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात जनसुराज्य शक्ती आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात लढत रंगली आहे. विनय कोरे यांनी जनसुराज्य शक्तीकडून निवडणूक लढवली आहे. तर सत्यजित पाटील यांनी ठाकरे गटाच्या तिकिटावर निवडणूक लढवली आहे. याठिकाणी संभाव्य आमदार म्हणून जनसुराज्य शक्तीचे विनय कोरे यांना पसंती मिळत आहे.

सकाळ समूहाच्या एक्झिट पोलच्या आकडेवारीवरून शाहूवाडी मतदारसंघात विनय कोरे यांना येथील मतदार संभाव्य आमदार म्हणून कौल देताना दिसत आहेत. त्यामुळे सत्यजित पाटील यांना पराभव स्वीकारावा लागण्याची शक्यता आहे.

शाहूवाडी येथील ज्या भागातून मतदान जास्त झालं आहे तिथे विनय कोरे यांचं वर्चस्व आहे. त्यामुळे अशा भागातील एकगठ्ठा मतं ही विनय कोरे यांना मिळणार आहेत. कोरे यांचा कारखाना आणि इतर सहकारी संस्थांचं जाळं याच मतदारसंघात असल्याचे याठिकाणी त्यांच्या नावाला पसंती मिळतंय दिसते. त्यांच्या तुलनेत सत्यजित पाटील यांचे या परिसरात काम नाही. त्यामुळे सत्यजित पाटील यांना याच गोष्टीचा फटका बसणार आहे. तर दुसरीकडे याचीच संधी विनय कोरे यांना असल्याने त्यांच नाव संभाव्य आमदार म्हणून पुढे येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT