Sharad Pawar Saam Tv
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Politics : पवारांनी डाव टाकला, माढ्याचं राजकारण पुन्हा तापणार, शिंदे-पाटलांमध्ये थेट सामना!

Maharashtra Election : माढा मतदारसंघात अभिजित पाटील आणि रणजितसिंह शिंदे यांच्यात थेट लढत होणार आहे. , कोण बाजी मारणार?

Namdeo Kumbhar

Maharashtra Assembly Elections 2024 : माढा विधानसभा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याच माढ्यात शरद पवारांनी नवा डाव टाकला आहे. त्यामुळे माढा मतदारसंघाचे राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. शरद पवार यांनी बबनदादा शिंदे यांना नाकारात पाटलांना संधी दिली आहे. त्यामुळे माढ्याकडे पुन्हा एकदा राज्याचे लक्ष लागलेय.

शरद पवार यांनी पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांच्या हाती तुतारी देऊन आमदार बबन शिंदे यांची कोंडी केली आहे. माढ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजीत पाटील विरूद्ध आमदार बबन शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांच्यात थेट लढत होणार आहे. तर दुसरीकडे पारंपारिक विरोधक मोहिते पाटील आणि शिंदे पुन्हा आमने सामने आले आहेत.

लोकसभा निवडणूकीत माढ्याचे आमदार बबन शिंदे आणि करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना विरोध केला होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतील विरोधाची धार विधानसभा निवडणुकीत ही कायम राहिली आहे.

मोहिते पाटलांमुळे शिंदेंची कोंडी?

आमदार बबन शिंदे यांनी शेवटच्या क्षणापर्यंत शरद पवार गटाची उमेदवारी मिळवण्याचे प्रयत्न केले, पण मोहिते पाटील यांच्या विरोधामुळे आमदार शिंदे‌ यांना उमेदवारी मिळाली नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे आमदार शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. काल झालेल्या निर्धार मेळाव्यात त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिंदे यांच्या अपक्ष उमेदवारीला समर्थन‌ दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची‌ उमेदवारी मिळाली नसली तरी शरद पवार यांचे आर्शिवाद मात्र आपल्या सोबत असल्याचा दावा करत आमदार शिंदे यांनी गुगली टाकली आहे. त्यामुळे माढ्याची ही निवडणूक मोहिते पाटी‌ल यांच्या प्रतिष्ठेची तर आमदार बबन शिंदे यांच्या अस्तित्वाची मानले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीच्या उपवासात चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

Aaditya & Amit Thackeray Emotional Hug: हातात हात धरून मंचावर आले,गळाभेट केली; अमित अन् आदित्य ठाकरेंचा तो VIDEO

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

SCROLL FOR NEXT