Amit Thackeray saam tv
Maharashtra Assembly Elections

Amit Thackeray: मुंबईत राज ठाकरेंना धक्का, अमित ठाकरेंचा पराभव; उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराने मैदान मारलं

Amit Thackeray: राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरलेले त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांचा दारुण पराभव झाला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरलेले त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांचा दारुण पराभव झाला आहे. माहीम मतदारसंघातून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांचा या विभागात विजय झाला आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांचं जन्मस्थळ हे माहीम आहे. त्यामुळे या विधानसभा मतदारसंघात यावेळेस दोन पक्ष समोरासमोर उभे होते. यामध्ये शिवसेना विरूद्ध शिवसेना असतानात मनसेने अमित ठाकरे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे माहीममध्ये तिरंगी लढत पाहायाला मिळाली. विशेष म्हणजे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.

माहीममधून अमित ठाकरे यांच्या विरोधात महायुतीतून देखील उमेदवार उभा होता. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना उमेदवारी देण्यात आली होती.

अमित ठाकरे यांच्या विजयाचा मार्ग सुकर होण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. यामध्ये भाजपच्या नेत्यांनी सदा सरवणकर यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी विनंती केली, मात्र सरवणकर आपल्या निवडणूक लढण्याच्या मतावर ठाम होते.

सरवणकरांचाही पराभव

विद्यमान आमदार सदा सरवणकरांनाही जनतेने नाकारल्याचं दिसून आलं. पक्षफुटीनंतर ठाकरेंची साथ न देणं, किंवा गेल्यावर्षी प्रभादेवीत गणपतीच्या मिरवणुकीत झालेला गोळीबार असो या प्रकरणांमुळे सरवणकर यांचा पराभव झाल्याचं म्हटलं जातंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आठव्या वेतन आयोगाबाबत डेडलाइन वाढली; आजच करा हे काम

Stylish Blouse Designs : साडी, लेहेंगा अन् स्कर्ट; एकाच ब्लाउजचे अनेक लूक्स, पाहा ट्रेंडी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून राष्ट्रवादी आणि भाजपमधील वाद टोकाला

Nashik TCS Case : लैंगिक शोषण अन् अश्लील टोमणे...; नाशिकच्या TCS धर्मांतर प्रकरणात २० तरुणींनी सांगितली आपबीती

Chanakya Niti Tips: 'या' 4 ठिकाणी दान केल्यास व्हाल मालामाल, चाणक्यांनी सांगितले झटपट श्रीमंत होण्याचे मार्ग

SCROLL FOR NEXT