Raj Thackeray And CM Eknath Shinde Meeting Saam Tv
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Election : माहीम, वरळीवरुन खलबतं होणार, राज ठाकरे आज शिंदेंसोबत चर्चा करणार!

Raj Thackeray News: माहीम आणि वरळी मतदारसंघातील रणनितीसाठी शिंदे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Namdeo Kumbhar

Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची रणधुमाळी सुरु असतानाच राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये भेट होत आहे. या भेटीमुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चेला उधाण आले आहे. माहीममध्ये राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे मैदानात आहेत. माहीममध्ये शिंदे राज ठाकरेंना पाठिंबा देणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या भेटीकडे सर्वांच्या नजरा लागल्या लागल्या आहेत. (Raj Thackeray Meet CM Eknath Shinde)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

माहीम, वरळी आणि शिवडी विधानसभा मतदारसंघ संदर्भात चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवसेना शिंदे गटाने मनसेला या मतदारसंघात पाठिंबा द्यावा अशी मनसेच्या काही नेत्यांनी मागणी केली आहे. लोकसभा निवडणुकीत मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता मात्र आता महायुती मनसेला मदत करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बिबट्याची दहशत, उन्हाचा तडाखा आणि गारपिटीचा कहर; मेंढपाळांवर तिहेरी संकट

Gold Price Today: सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठा बदल, वाचा २२ अन् २४ कॅरटचे आजचे दर

Namo Shetakri Yojana: शेतकऱ्यांनो नमो शेतकरी योजनेचे ₹२००० मिळाले का? अशा पद्धतीने चेक करा स्टेट्स

नांदेडमध्ये रक्तरंजित थरार ! गँगवारमध्ये तिघांचा मृत्यू, शहरात दहशत

Dandruff Home Remedy : केस धुवण्यापूर्वी करा 'हे' काम, टाळूला येणार नाही खाज अन् कोंडाही होईल गायब

SCROLL FOR NEXT