Supriya Sule on Chhagan Bhujbal Saam Digital
Maharashtra Assembly Elections

Supriya Sule : छगन भुजबळांच्या दाव्यानं नवं वादळ; सुप्रिया सुळे म्हणाल्या...

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांनी सरदेसाई यांच्या पुस्तकात केलेल्या कथित दाव्यावर त्या बोलत होत्या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Supriya Sule on Chhagan Bhujbal: एका पुस्तकातील दावा अतिशय गंभीर विषय आहे. मी अनेकदा बोलले आहे, घर फोडणे, पक्ष फोडणे हे मी गेले अनेक दिवस बोलत आहे. काश्मीर टू कन्याकुमारीमध्ये इडी, सीबीआय, इन्कम टॅक्स याचा 95 टक्के वापर केला आहे वॉशिंग मशीन मध्ये टाकून भाजप सरकार स्थापन करत आहे, असा हल्लाबोल सुप्रिया सुळे यांनी केला. छगन भुजबळ यांनी सरदेसाई यांच्या पुस्तकात केलेल्या कथित दाव्यावर त्या बोलत होत्या.

इन्कम टॅक्स, सीबीआय ईडी याचा वापर केला जातोय. यामध्ये महिलाच उल्लेख आहे, हे अदृश्य शक्ती ने माझ्या बहिणीवर घरी रेड केली. पाच दिवस रेड केली, ईडी ने त्रास दिला. भुजबळ,मलिक,राऊत यांचा कुटुंब कशातून गेले असतील. फडणीवस यांनी मुख्यमंत्री झाल्यावर अजित पवार यांना फाईल दाखवली. ते मुख्यमंत्री असताना कारवाई त्यांनी केली. फाईल दाखवली देवेंद्र फडणवीस यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्याच्यावर खटला दाखल झाला पाहिजे, असे सुप्रिआ सुळे म्हणाल्या.

राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात सुनेत्रा पवार यांचाही उल्लेख आहे. त्यांचं कशाला नाव आणायचं. याची काय गरज होती का? माझ्या बहिणीच्या घरी रेड करण्याचं कारण काय? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. शरद पवार यांना दोन-तीन वेळा सांगण्याचा प्रयत्न केला. पण शरद पवार यांनी भाजप सोबत जाण्यासाठी नकार दिला, असे पुस्तकात सांगण्यात आलेय, असेही त्या म्हणाल्या.

आरटीआय फाईल तुम्ही टाका किती तुम्हाला फाईल पाहायला मिळतात हे बघू . अजित पवार यांच्यावर पहिला आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यानंतर फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर फायनल सही फडणवीस यांची होती. म्हणून फडणवीस यांनी सही केली, अजित पवार यांना घरी दाखवून त्यांनी फाईल दाखवली, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salman Khan : बाप लेकाचा स्वॅग न्यारा! दबंग स्टाइलमध्ये भाईजान बसला वडिलांच्या बाईकवर, पाहा PHOTO

Exit Poll Maharashtra : दापोली विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll: रत्नागिरी मतदारसंघातून उदय सामंत होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll: गोदिंयामधून भाजपचे विनोद अग्रवाल होणार आमदार? पाहा Exit Poll

Mankhurd Exit Poll: अबू आझमी की नवाब मलिक, मानखुर्द विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण?

SCROLL FOR NEXT