Maharashtra Election: लोकसभेत तह विधानसभेत चेकमेट; पुरंदरमध्ये राष्ट्रवादीनेच वाढवलं महायुतीच्या विजय शिवतारेंचं टेन्शनउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आणि त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र अजित पवारांनी बारामतीकरांसमोर लोकसभेतली चूक पुन्हा एकदा मान्य करून विधानसभेत आपल्या काकांनी काय चूक केली ते सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पवारांचं घर कुणी फोडलं याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. त्यावरचाच हा विशेष रिपोर्ट.
बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार
आजोबाचा नातवाला मोलाचा सल्ला
दादा म्हणतात, आता काकांनी चूक केली
अजितदादांना का उपरती झाली?.अन् दादांना पश्चात्ताप होतोय का ?..तरी दादा पुतण्याला आव्हानं देतायत. हे सगळं का झालं हे समजून घ्यायला थोडं फ्लॅशबॅकमध्ये जावं लागेल..मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात अभेद्य कूटुंब म्हणून ओळखलं जाणाऱ्या पवार कुटुंब का फुटलं ? कुणी फोडलं हा प्रश्न कायम आहे.
मुळात पवारांना कमकुवत करायचं असेल तर दादांना त्यांच्यापासून दूर करणं हा एकमेव अजेंडा दिल्लीश्वरांचा होता. त्यातून मग दादांना कधी गोंजारण्यात आलं तर कधी धमकवण्यात आलं असं बोललं जातं.
याची सुरुवात होते 2019 मधून अजित पवारांनी तडकाफडकी भाजपासोबत आघाडी केली.. अन् अवघ्या 80 तासांत सरकार पडलं आणि अजित पवार स्वगृहीसुद्धा परतले...पुढे अजित पवारांनी शरद पवारांच्या विरोधात दुसऱ्यांदा बंड केलं आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी पवारांना हे बंड शमवता आलं नाही. कारण यावेळी अजित पवार केवळ सरकारमधून, पक्षातून बाहेर पडले नाहीत तर त्यांनी चक्क राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरच दावा केला.
लोकसभेनंतर आता पुन्हा विधानसभेच्या मैदानात पवार विरुद्ध पवार सामना रंगणार आहे.. बारामतीमध्ये अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार असा सामना रंगेल..शरद पवारांच्या उपस्थितीत युगेंद्र पवार यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी पवारांनी युगेंद्रला कानमंत्र दिला.मात्र यातून पवार कूटुंब दुरावणार आहेच.
युगेंद्र पवार यांचं परदेशात शिक्षण,उच्चशिक्षित
प्रशासन आणि व्यवसायाचा चांगला अनुभव
पक्षानं जाणकार तरुणाला बारामतीत संधी दिली
बारामतीची जनता नव्या पिढीच्या नव्या नेतृत्वाच्या पाठीशी
जनतेशी बांधिलकी ठेवा,विनम्रता राखा, संधी विनम्रतेने स्वीकारा, सेवेसाठी जागृत राहा.
राजकारणाच्या पटलावर नात्यांची ही लढाई, जिची कल्पना काही महिन्यांपूर्वी इथं कधीही शक्य नव्हती. कधी मुंडे कुटुंबात, कधी ठाकरे कुटुंबात, अशा राजकारणातल्या घराण्यांच्या वाटेला जे आलं, तेच एकसंध पवार कुटुंबात घडलं. राजकारणात आणि सत्तेच्या स्पर्धेत कुणी कुणाचं नसतं हेच खरं.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.