Maharashtra Election 
Maharashtra Assembly Elections

Maharashtra election : फक्त २ दिवस शिल्लक, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही, मविआत गोंधळात गोंधळ!

Maharashtra Assembly Election 2024 : उमेदवारी अर्ज भरण्यसााठी दोन दिवस शिल्लक राहिलेत, मात्र २३ जागांवर उमेदवार जाहीर नाही.

Namdeo Kumbhar

Maharashtra Election 2024: विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. मात्र, मविआचा गोंधळ काही संपत नसल्याचे दिसत आहे. मविआने २३ जागांवर अद्याप उमेदवारच दिला नाही. तर काही जागांवर दोन पक्षांनी एकाच मतदारसंघात उमेदवार दिल्याने राजकीय चर्चा सुरु आहेत.

लोकसभेला अधिकृत जागावाटप करत आघाडी घेणारी मविआ विधानसभेला पिछाडीवर पडल्याचे दिसत आहे. मविआचा राजकीय गोंधळामुळे मतदार, कार्यकर्ते संभ्रमात जाण्याची शक्यता आहे. मविआने मित्रपक्षांना काही जागा सोडल्यात, मात्र ती वाटाघाटी गुप्त ठेवण्यात आली आहे. मविआचा जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी फक्त दोन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी फक्त दोन दिवसाचा कालावधी शिल्लक असतानाही मविआचा जागावाटपाचा घोळ संपलेला दिसत नाही. मविआचे २३ जागांवर उमेदवार जाहीर होणं अद्याप बाकी आहे. कागी जागांवर मित्रपक्षांमध्ये तिढा आहे, तर काही जागांवर एकापेक्षा जास्त इच्छूक असल्यामुळे अडचण येत आहे.

कोण कोणते मतदारसंघात उमेदवार दिला नाही -

सिंदखेड

शिरपूर

अकोला पश्चिम

दर्यापूर

वरुड मोर्शी

पुसद

पैठण

बोरिवली

मलुंड

मलबार हिल

कुलाबा

खेड आळंदी

दौंड

मावळ

कोथरूड

औसा

उमरगा

माढा

वाई

माण

सातारा

मिरज

खानापूर

मित्रपक्षाला कोणते मतदारसंघ सोडले -

भिवंडी पूर्व - सपा

मानखुर्द शिवाजीनगर - सपा

पेण - शेकाप

अलिबाग - शेकाप

श्रीवर्धन - शेकाप

कळवण - माकप

डहाणू - माकप

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अतिवृष्टीने केळीची बाग उध्वस्त,संतप्त शेतकऱ्याने कोयता हातात घेऊन बाग तोडली

Dehydration despite drinking water: 3 लीटर पाणी प्यायल्यानंतरही डिहायड्रेशनचा त्रास होतोय? वाचा काय आहेत यामागची कारणं

Snake Fact: नाग आणि नागीणमध्ये फरक काय? कसा ओळखायचा?

Bread Pizza Recipe: घरच्या घरी बनवा स्वादिष्ट ब्रेड पिझ्झा, सोप्या पद्धतीने तयार करा मजेशीर स्नॅक

iPhone 17 Pro: 'या' ५ देशांमध्ये Apple iPhone 17 Pro स्वस्तात मिळणार, ₹37,424 होईल बचत

SCROLL FOR NEXT