जयंत पाटील  Saamtv
Maharashtra Assembly Elections

Maharshtra politics : विधानसभा निवडणुकीआधीच निकालाबाबत मोठी भविष्यवाणी, जयंत पाटील यांनी आकडाच सांगितला!

Maharshtra politics : विधानसभा निवडणुकीच्या आधीच निकालाबाबत जयंत पाटील यांनी सोलापुरात मोठी भविष्यवाणी केली आहे.

Namdeo Kumbhar

Maharshtra politics : विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. दोन महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे जयंत पाटील यांनी किती जागा जिंकणार, याचा आकडाच सांगितलाय. सोलापूरमधील मोहोळ येथील सभेत बोलताना जयंत पाटील यांनी आगामाी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ५४ पेक्षा जास्त जागा जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत आपण अभूतपूर्व यश महाविकास आघाडीला दिलं आहे. प्रणिती शिंदे यांना मोहोळ मतदारसंघाने लीड दिल त्याबद्दल जयंत पाटील यांनी आभार व्यक्त केले. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या लोकांनी चमत्कार घडवत महाविकास आघाडीला 48 पैकी 31 जागा जिंकून दिल्या. संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात पवार साहेबांचा प्रभाव आहे. जेव्हा संकट आले तेव्हा पवार साहेब सोलापुरात आले आहेत, असे जयंत पाटील म्हणाले.

5 वर्षांपूर्वी ही आम्ही शिवस्वराज्य यात्रा काढली होती, त्यामुळे राज्यात 54 आमदार आपले निवडून आले होते. उद्याच्या (विधानसभा) निवडणुकीत 54 पेक्षा जास्त जगावर राष्ट्रवादी काँग्रेस निवडून येतील. महाविकास आघाडीने आपल्या अडीच वर्षात चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला. दोन मराठी माणसाने निर्माण केलेले दोन पक्ष भाजपाने फोडले. पवार साहेब यांना सोडून गेलेल्या नेत्यासोबत राज्यातील जनता गेली नाही

सध्या महाराष्ट्रात मोठमोठे कार्यक्रम पाहायला मिळत आहेत. सत्ताधारी लोकांनी तिजोरीच दार काढून ठेवले आहे. रवी राणा म्हणतात माला मत नाही दिल तर खात्यात येणारे पैसे काढून घेतो. एवढी मागरुरी महाराष्ट्रातील आत्तापर्यंत कोणत्याचं नेत्याकडे नव्हती, असा टोला राणा यांना लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

Pune Traffic : पुण्यातील वाहतूक कोंडी फुटणार, ३ राष्ट्रीय महामार्गांवरील उपाययोजना ठरतील रामबाण

Tiger Attack : गुरांना चारा घेण्यासाठी गेले असता वाघाचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, आठवड्याभरातील दुसरी घटना

Raksha Bandhan 2025: भावाला चांदीची राखी बांधल्याने काय फायदे होतात?

Sangali : यंदा नागपंचमीला शिरळकरांना जिवंत नागाचे दर्शन | VIDEO

SCROLL FOR NEXT