Assembly Election 
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Politics: मराठवाडा-विदर्भासाठी भाजपचं मायक्रो प्लॅनिंग; शाह - पवारांमध्ये राजकीय कुस्ती

Assembly Election : विधानसभेत महायुतीला पराभूत करण्यासाठी शरद पवार कंबर कसलीय. जागोजागी भाजपला सुरूंग लावत भाजपला धोबीपछाड देत आहे. तर शरद पवार यांना रोखण्यासाठी भाजपचे चाणक्य अमित शहा देखील मैदानात उतरलेत.

Tanmay Tillu

लोकसभा निवडणुकीत दणका बसल्यानंतर आता भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी चांगलीच कंबर कसलीये. मराठवाडा-विदर्भासाठी अमित शाहांचं मायक्रो प्लॅनिंग सुरु झालंय. मात्र अमित शहांच्या मनसुब्यांना सुरुंग लावण्याची तयारी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी केलीये. त्यामुळे राजकीय पटलावर विधानसभेला कुस्ती रंगणार हे नक्की. त्यावरचाच हा विशेष रिपोर्ट.

लोकसभा निवडणुकीत दणका बसल्यानंतर आता भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी चांगलीच कंबर कसलीये.. त्यासाठी भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शाह हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. अमित शाहांनी नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमधील भाजप नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी अमित शाह यांनी विधानसभा निवडणुकीत आपले प्रमुख उद्दिष्ट हे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना रोखणं, हेच असेल असं सांगितलंय.

राज्यातील सत्तेचा मार्ग विदर्भातून जाणार असल्याचा उल्लेख करत भाजप पदाधिकाऱ्यांना 'इलेक्शन मोड'वर आणण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांनी नागपुरात पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिला..अमित शाह काय म्हणालेत. पाहूया.

शरद पवारांना रोखण्याचा 'मेगाप्लॅन

शरद पवारांना रोखायचं असेल तर विदर्भात 45 जागा जिंकाव्या लागतील.

विदर्भात 45 जागा जिंकलो तर महाराष्ट्रात सरकार येईल.

शरद पवार आणि काँग्रेसला रोखायचंय, त्यासाठी 45 जागा हव्यात.

शरद पवार आणि ठाकरेंना रोखणं आपलं लक्ष्य

प्रत्येक बुथवर 10 टक्के मतं वाढवा

बुथ पातळीवर मविआच्या कार्यकर्त्यांना जोडा

लोकसभेवेळी पसरलेला नरेटिव्ह खोडून काढा

दरम्यान अमित शाहांच्या मनसुब्यांना सुरुंग लावण्यासाठी ठाकरे- पवार सज्ज असल्याचं पाहायला मिळतंय. मराठा आरक्षण आंदोलनाचा प्रश्न पेटलायं...दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण नको, यासाठी ओबीसी समाजाचे नेतेही आक्रमक झाले आहेत.. राज्यात अभूतपूर्व अशी सामाजिक, राजकीय परिस्थिती निर्माण झालीये. राजकारणातील वस्ताद शरद पवार चाणक्यांच्या मनसुब्यांना सुरुंग लावणार की चाणक्यांचे डाव खरे ठरणार हेच पाहायचं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

Attraction to toxic men: मुली टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये का अडकतात? 'ही' 6 मानसिक कारणं समजून घ्या

Nagpur : पिकांच्या संरक्षणासाठी तारेत सोडला विद्युत प्रवाह; चारा कापताना झाला घात, विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

Aamhi Saare Khavayye : खुशखबर! मराठी कुकिंग शो 'आम्ही सारे खवय्ये' येतोय? पाहा VIDEO

Rave Party: रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय?

SCROLL FOR NEXT