- सचिन सावंत - Saam Tv
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Elections : काँग्रेसने उमेदवारी दिली, पण सचिन सावंत म्हणतात दुसऱ्याला संधी द्या, नेमकं प्रकरण काय?

Sachin Sawant, Maharashtra Elections 2024 : अंधेरी पश्चिममधून काँग्रेसने सचिन सावंत यांना उमेदवारी दिली. पण त्यांनी हायकमांडकडे मला हा मतदारसंघ नको असल्याचे सांगितलेय.

Namdeo Kumbhar

Sachin Sawant, Maharashtra Elections 2024 : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यासाठी राज्यातील सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. शनिवारी रात्री काँग्रेस पक्षाकडून 16 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. मात्र, ही तिसरी यादी जाहीर केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपली उमेदवारी माघारी घ्यावी अशी मागणी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडे केली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्येही खळबळ उडाली आहे. वांद्रे पूर्व येथून उमेदवारी मागितली होती, पण अंधेरी पश्चिममध्ये उमेदवारी मिळाली, असे सचिन सावंत यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलेय.

वांद्रे पूर्व मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती, पण हा मतदारसंघ ठाकरे गटाला गेला आहे. मला अंधेरी पश्चिममध्ये उमेदवारी मिळाली आहे. मी मतदारसंघ बदलून देण्याचा निर्णय हायकमांडवर सोपवला आहे. अंधोरी पश्चिमधून माझ्याऐवजी दुसऱ्या कार्यकर्त्याला संधी मिळावी, अशी माझी इच्छा आहे. यामध्ये नाराजीचा कोणताही भाग नाही, असेही ट्वीटमध्ये सचिन सावंत यांनी म्हटलेय.

सचिन सावंत यांनी आपल्या ट्वीटमध्ये नेमकं काय म्हटलेय ?

मी वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. तीथेच लढावे अशी माझी इच्छा होती. परंतु तो मतदारसंघ शिवसेना उबाठा पक्षाकडे गेला आहे. मी अंधेरी पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती. तरी पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मनापासून धन्यवाद! परंतु मी महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नितला यांना पक्षाने निर्णय बदलावा याकरिता विनंती केली आहे. मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी माझ्या विनंतीचा सहानुभूतीपूर्वक विचार करतील ही आशा बाळगतो.

अंधेरीत भाजप अन् काँग्रेसमध्ये आमना सामना ?

अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघ महायुतीमध्ये भाजपला मिळाला तर मविआमध्ये काँग्रेसला हा मतदारसंघ मिळाला. या ठिकाणी भाजपचे अमित साटम हे उमेदवार आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अमित साटम यांनी 65,615 मते मिळवत काँग्रेसच्या अशोक जाधव यांचा पराभव केला होता. अंधेरी पश्चिम मतदारसंघातून साटम दोन वेळा आमदार राहिले आहेत. अंधेरी पश्चिम मतदारसंघातून सचिन सावंत यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. पण त्यांनी उमेदवारी बदलण्याची विनंती हायकमांडला केली आहे. काँग्रेस या मतदारसंघातील उमेदवार बदलणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nangartas Waterfall : शहराच्या गजबजाटापासून दूर वसलाय नांगरतास धबधबा, पाहता क्षणी ताणतणावातून व्हाल Relax

Maharashtra Live News Update: नजर ठेवण्यासाठी पोलीसांकडून अत्याधूनिक ड्रोनचा वापर

Eye Care: डोळ्यांसाठी सर्वात महत्वाचे आहेत 'हे' व्हिटामिन, ९९% लोकांना माहिती नसेल

बाबोsss ! २० हजाराला कोथिंबीर जुडी, ४१ हजाराला एक नारळ, पाहा VIDEO

Gautami Patil New Song: सबसे कातील गौतमी पाटीलचं “राणी एक नंबर” गाणं प्रदर्शित

SCROLL FOR NEXT