Maharashtra Election  
Maharashtra Assembly Elections

EVM हॅक करून जिंकून देतो; ५ लाख द्या नाहीतर...; ठाकरे गटाच्या उमेदवाराकडे खंडणीची मागणी

Maharashtra Election : नाशिक मध्यमधील ठाकरे गटाचे उमेदवार वसंत गिते यांच्याकडे एका व्यक्तीने ५ लाख रुपयांची खंडणी मागितीली होती. ईव्हीएम हॅक करण्यासाठी खंडणीची मागणी केली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिजीत सोनवणे, साम प्रतिनिधी

ठाकरे गटाच्या उमेदवाराकडे ५ लाख रुपयांची खंडणी मागण्यात आल्याची घटना नाशिकमधील घडलीय. ईव्हीएम हॅक करून तुम्हाला जिंकून देतो, त्यासाठी ५ लाख रुपये. जर पैसे नाही दिले तर तुमचा पराभव करतो अशी धमकी देत खंडणीची मागणी ठाकरे गटाच्या उमेदवाराकडे एकाने केलीय. याप्रकरणी कारवाई करत नाशिकमधील मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी एकाला अटक केलीय.

मुंबई नाका पोलिसांनी अवघ्या चार तासात कारवाई करत आरोपीला पकडलंय. निवडणुकीत ईव्हीएम हॅक केला जातो की नाही? यावरून पक्षांमध्ये मतभेद आहेत. शिवाय ईव्हीएम हॅक करून निवडणुका जिंकल्या जातात, असा आरोप अनेकांकडून केला जातो. यावरून एका व्यक्तीने थेट उमेदवाराशी संपर्क करत ईव्हीएम हॅक करून जिंकवण्याचं आमिष दिलं. निवडणुकीत जिंकवण्यासाठी ५ लाख रूपये द्या नाहीतर पराभव करेल अशी धमकी देत खंडणी मागितली. विशेष म्हणजे खंडणी मागणारा व्यक्ती थेट उमेदवाराच्या कार्यालयात गेला आणि त्यांच्याकडे पैशांची मागणी केली.

नाशिक मध्यमधील उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार आणि माजी आमदार वसंत गीते यांच्या कार्यालयात येत ईव्हीएम मशीन हॅक करून तुम्हाला विजयी करून देतो, त्यासाठी ४२ लाख रुपये लागतील. पैसे न दिल्यास मशीन सेट करणारे माझ्या ओळखीचे आहेत, त्यांना सांगून तुमचा पराभव निश्चित असल्याचे सांगत ५ लाख रुपयांची खंडणी मागितली. या भामट्याला पोलिसांनी अवघ्या ४ तासांत ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली. निवडणुकांमध्ये पैसे कमवण्याची संधी पाहून आपण हा प्रकार केल्याचे आरोपीने चौकशीत कबूल केले.

भगवानसिंग चव्हाण, असं आरोपीचं नाव असून तो मूळचा राजस्थानचा असून सध्या नाशिकच्या म्हसरूळ परिसरात रोजगाराच्या निमित्ताने राहतोय. त्याने नाशिकमध्ये आमदार वसंत गीते यांच्या कार्यालयात जाऊन कार्यालयातील आनंद शिरसाठ यांना 'मी तुम्हाला ईव्हीएम मशीन हॅक करून १० मतदानापैकी ३ ते ४ मते तुम्हाला मिळवून देऊन निवडणुकीमध्ये जिंकून देतो. बदल्यात ४२ लाख रुपये लागतील, असे सांगितले. त्यापैकी ५ लाख आता द्यावे, अशी मागणी केली.

पदाधिकाऱ्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर पैसे न दिल्यास प्रोग्रामिंग करणारे माझे ओळखीचे आहेत. मशीन हॅक करून तुमचा उमेदवार पराभूत करेन, अशी धमकी त्याने दिली. त्यानंतर तो पत्ता सांगून निघून गेला. शिरसाठ यांनी याप्रकरणी बुधवारी मुंबई नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी भगवानसिंगला उचलले.

लोकसभेवेळीही घडला होता असा प्रकार

असाच प्रकार लोकसभा निवडणुकीच्या वेळीदेखील घडला होता. ईव्हीएम हॅक करून हवा तसा निकाल लावून देतो, असा फोन करत हॅकरने अंबादास दानवे यांच्याकडे अडीच कोटी रुपयांची मागणी केली होती. दानवेंना फोन करून त्यांच्याकडे पैशांची मागणी करणारा व्यक्ती हा सैन्य दलात कार्यरत होता. तो सुट्टीवर आलेला असताना त्याने हा प्रकार केला होता.

या व्यक्तीला पुण्यातून ताब्यात घेण्यात आले होते. अंबादास दानवेंना त्याने आपली ओळख मेजर अशी करून दिली होती. त्याचे नाव मारुती ढाकणे असून पोलिसांनी त्याला एक लाख रुपये घेताना रंगेहाथ पकडले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: मराठा समाजाचा फेव्हरेट पक्ष कोणता? मराठा समाज कुणाचं गणित बिघडवणार?

Assembly Election: नवाब मलिकांच्या प्रचारासाठी अजित पवार मैदानात; भाजपच्या विरोधाला दादांचा ठेंगा

Worli Politics: वरळीत फोडाफोडी, खोक्याचं राजकारण सुरू झालं; मिलिंद देवरा यांची टीका

Suniel Shetty Injury : सुनील शेट्टी जखमी; अॅक्शन सीन करताना दुर्घटना, सेटवर नेमकं काय घडलं?

Bageshwar Baba: बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमात घडला अनर्थ; चेंगराचेंगरीत महिला-लहान मुलं जखमी

SCROLL FOR NEXT