eknath shinde  Saamtv
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Election: मी शिवसेना चोरताना तुम्ही झोपले होते का? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

CM Eknath Shinde: बाळापूरमध्ये घेण्यात आलेल्या जाहीर सभेत बोलतांना मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर पटलवार केलाय.

Bharat Jadhav

Maharashtra Vidhan Sabha: दोन वर्षांपूर्वी मी उठाव केला अन् नवीन सरकार आणलं. शिवसेना चोरली असं लहान मुलासारखं म्हणता, मग मी शिवसेना चोरतांना तुम्ही झोपले होते का? असा सवाल करत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केलाय. ते बाळापुरची येथील एका प्रचार सभेत बोलत होते.

एकनाथ शिंदेंनी शिवसेना पक्ष चोरला, चिन्ह चोरलं अशी टीका उद्धव ठाकरे वारंवार करत असतात. त्यावरून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पलटवार केलाय. महाराष्ट्रात दोन वर्षांपासून महायुतीचा विकासाचा अजेंडा आहे. बाळापूरमध्ये बोलत असताना मुख्यमंत्री शिंदे यांनी मैने एक बार कमिटमेंट किया की मै खुद का भी नही सुनता, अशी डायलॉगबाजी देखील केली.

दोन वर्षांपूर्वी मी उठाव केला आणि नवीन सरकार आणलं. ज्या उबाठाने आमचा धनुष्यबाण गहाण ठेवला होता तो आम्ही सोडवून आणलं. राजा का बेटा राजा नही बनेगा, जो काम करेगा वही राजा बनेगा, असंही शिंदे म्हणालेत. उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. शिवसेना चोरली असं लहान मुलासारखं म्हणतात. मग मी शिवसेना चोरतांना तुम्ही झोपले होते का? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. सत्ता सोडून आम्ही बाहेर पडलो, जिथे बुक्यांचा मार सहन करावा लागला तिथे थांबणे तुम्हाला मान्य आहे का? असंही ते म्हणाले.

लाडक्या बहिणींसाठी तुरुंगात जाणार

महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आम्ही केलेल्या काम तुमच्यासमोर आहे. मविआने सर्व कामात खोडा घातला.उद्योग पळवले म्हणता, आज पाहाल महाराष्ट्र एकवर आहे.. मोठी गुंतवणूक राज्यात आहे. सरकारची लाडकी बहीण योजना खूप लोकप्रिय झालीय. यावरून विरोधक सरकारवर टीका केली होती. त्यावर बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले, मविआ लाडकी बहीण योजना बंद पाळायला कोर्टात गेले, पण कोर्टानं त्यांच्या थोबाडीत मारली.

विरोधकांना लाडकी बहीणीचं दुःख त्यांना काय माहिती नाहीये. तरीही ते म्हणातात त्यांच सरकार आलं की, सर्व योजनांची चौकशी लावू . या पोकळ धमक्यांना आपण घाबरत नसल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले. लाडक्या बहिणीसाठी एकनाथ शिंदे जेलमध्ये जायला तयार असं मुख्यमंत्री म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अशोक खरातच्या मुलाची काल रात्री चौकशी

Crime News: घरात पतीचा मृतदेह दिसताच पत्नीनं १७ मजल्यावरून मारली उडी; इंजिनिअर जोडप्याच्या मृत्यूनं परिसरात खळबळ

New Labour Law: नवीन कायदा लागू; तुमचा पगार कमी होणार की वाढणार? लेबर कोडमध्ये नेमकं काय?

Mumbai Pune Tourist Spots: मुंबई-पुण्याजवळ वसलेल्या स्वर्गाहून सुंदर 'या' बेस्ट वीकेंड डेस्टिनेशनला द्या भेट

Oracle Layoff: कामावर येऊ नका; एका रात्रीत ३०,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढलं | VIDEO

SCROLL FOR NEXT