Ajit Pawar 
Maharashtra Assembly Elections

Ajit Pawar: बारामतीचा 'दादा' मीच; निकालापूर्वीच अजित पवारांनी सांगितलं मताधिक्य

Maharashtra Election: बारामतीतून किती मताधिक्यानं निवडून येणार याबाबत अजित पवारांनी जाहीर भाष्य केलंय. अजितदादांनी एकप्रकारे बारामतीकरांची गॅरंटीच दिलीये. त्यामुळे बारामतीच्या लढतीबाबत अधिक उत्सुकता वाढलीय.

Tanmay Tillu

विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरु झाल्यानंतर बारामती विधानसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहे. कारण या मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

त्यामुळे बारामतीतील काका-पुतण्याच्या लढाईत कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं असतानाच अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्यात. कारण अजित दादांनी केवळ निकालच नव्हे तर थेट मताधिक्यच सांगितलंय.

अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांसोबत घरोबा केला आणि सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर लोकसभेत प्रथमच पवार कुटुंबीय एकमेकांविरोधात निवडणुकीला सामोरे गेले.. या लढतीत सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली तर सुनेत्रा पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

या पराभवाची सल आजही अजित पवार यांच्या मनात असल्याचे दिसतंय. त्यानंतर विधानसभेत आता पुन्हा पवार विरुद्ध पवार सामना रंगणार आहे...त्यामुळे शरद पवारांचे डावपेच यंदाही यशस्वी ठरणार की अजित पवारांची बारामतीतील दादागिरी कायम राहणार यासाठी 23 नोव्हेंबरची वाट पाहावी लागेल.

बारामतीकरांनी लोकसभेला माझा करेक्ट कार्यक्रम केला

सुनेत्रा पवार यांचा सुप्रिया सुळे यांच्याकडून पराभव झाला होता. या पराभाची सल अजित पवार यांच्या मनात कायम आहे. अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीत ती सल आणि मनातील खदखद पुन्हा एकदा बोलून दाखवली. लोकसभेला बारामतीकरांनी माझा करेक्ट कार्यक्रम केला, अशी खंत अजित पवार यांनी बोलून दाखवली. लोकसभेला साहेबांना वाईट वाटू नये म्हणून ताईंना मोठ्या संख्येने मतदान केले. बारामतीकरांनी माझा करेक्ट कार्यक्रम केला. मी तो स्वीकारला, असे अजित पवार म्हणाले. मात्र विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात ते सकारात्मक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

65 पैकी 63 शाळा बोगस; शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात बडा मासा लागला गळाला, क्राइम ब्रांचची मोठी कारवाई

Medicine Price Drop: बीपी, हार्ट अटॅक आणि डायबेटिस पेशंटला दिलासा; औषधं ४० टक्के स्वस्त, ३९ औषधांच्या किंमती होणार कमी

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेवरून वाद उफाळला; एसआयटी चौकशीची मागणी

Vietnam Boat Accident: मोठी बातमी! व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांची बोट उलटली, १५ जणांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: मोशी कचरा डेपो इमारत दुर्घटना प्रकरणात मृतांचा आकडा आता पोहोचला चारवर

SCROLL FOR NEXT