Sakal Exit Poll Saam Tv
Maharashtra Assembly Elections

Exit Poll Maharashtra : औरंगाबाद पूर्वमधून भाजपचे अतुल सावे होणार आमदार? पाहा Exit Poll

Aurangabad East Exit Poll: औरंगाबाद पूर्वमध्ये भाजपचे अतुल सावे संभाव्य आमदार आहेत. औरंगाबाद पूर्वमध्ये इम्तियाज जलील आणि अतुल सावेंमध्ये लढत होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद पूर्वमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. भाजप विरुद्ध काँग्रेस अशी चुरसीशी लढत या मतदारसंघात आहे. औरंगाबाद पूर्वमध्ये भाजपचे अतुल सावे विरुद्ध काँग्रेसचे लहू शेवाळे अशी लढत होती. त्याचसोबत माजी खासदार इम्तियाज जलीलदेखील उभे आहेत. त्यामुळे या मतदारसंघात कोण निवडून येणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

भाजपचे अतुल सावे या निवडणुकीत गड राखणार असल्याचे दिसत आहे.या मतदारसंघात मतविभाजनाचा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे. औरंगाबाद पूर्व मतदारसंघात अनेकांनी बंडखोरी केली होती. त्यामुळेच भाजपचे अतुल सावे निवडून येऊ शकतात.

औरंगाबाद पूर्वमध्ये पुन्हा एकदा विद्यमान आमदार अतुल सावे निवडून येतील, असं चित्र दिसत आहे. अतुल सावे यांचा प्रभाव या मतदारसंघात जास्त आहे. या मतदारसंघातून ते तिसऱ्यांदा निवडणुकीसाठी उभे आहेत.सलग दोन वेळा ते मंत्री होते. या काळात त्यांनी या मतदारसंघाचा विकास मोठ्या प्रमाणात केला आहे. (Sakal Exit Poll)

छत्रपती संभाजी नगरमध्ये हिंदु आणि मुस्लिम मतदारांची विभागणी झाली आहे. या निवडणुकीत मुस्लिम मतदार हे इम्तियाज जलील यांच्या बाजूने आहेत तर हिंदु मतदारांचा कौल अतुल सावे यांच्या बाजूने आहे. त्यामुळे ही लढत फारच चुरशीची होणार आहे. (Aurangabad East Exit Poll)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT