Ajit Pawar Saam Tv
Maharashtra Assembly Elections

Ajit Pawar: बारामतीत दादांना मोदी-शाह नको? विजयाचं गणित बिघडण्याची भीती?

Ajit Pawar News: लोकसभेला महायुतीला फटका बसल्याने नेते सावध झाले आहेत. यासाठी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या सभा होत आहेत. मात्र, बारामतीत या दोन्ही नेत्यांची सभा होणार नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बारामतीत दादांना मोदी नको?

लोकसभेला फटका बसल्यामुळे महायुतीचे नेते अधिक सावध झालेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या राज्याच्या अनेक सभा होत आहेत. महाराष्ट्रात मोदींची तोफ धडाडत असताना बारामतीत मात्र मोदींची सभा होणार नाही. कारण अजित पवारांनी मोदींच्या सभेला नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. कौटुंबिक लढाई असल्यामुळे अजित पवारांनीच मोदींना लांब ठेवल्याची चर्चा रंगलीय. (Ajit Pawar News)

2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बारामतीत सभा झाली होती. असं अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले, "त्यावेळेस गोष्ट वेगळी होती. त्यावेळी त्यांना मला पराभूत करायचं होतं, म्हणून त्यांनी बारामतीत सभा घेतली होती.

अजित पवार, उपमुख्यमंत्री

लोकसभा निवडणुकीत शरद पवारांवर टीका झाल्यानं त्याचा प्रतिकूल परीणाम महायुतीवर झाला. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवारांना सहानभूती असल्याचं स्पष्ट झालंय. लोकसभेत शरद पवारांच्या पक्षाचा सर्वात जास्त स्ट्राईक रेट आहे. (Maharashtra Assembly Election)

१० जागा लढवून ८ जागांवर विजय मिळविला. सदाभाऊ खोत यांनी नुकतीच पवारांच्या चेहऱ्यावरुन टीका केली. त्यावरुन दादांनी खोतांना थेट फोन करुन खडसावलं आहे. लोकसभेला तोंड पोळल्यामुळे विधानसभेला अजित पवार ताकही फुंकून पित आहेत. त्यामुळेच दादांनी बारामतीसाठी मोदींना दूर ठेवल्याची चर्चा रंगू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT