Thane Constituency 
Maharashtra Assembly Elections

SAAM Exit Poll: ठाणे मतदारसंघातून संजय केळकर होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Thane Constituency Exit Poll : ठाणे मतदारसंघामध्ये संजय केळकर आणि राजन विचारे यांच्यात प्रमुख लढत झाली. या मतदारसंघामध्ये भाजपाचं पारडं जड असल्याचे दिसून येत आहे.

Dhanshri Shintre

सध्या राज्यात काल २० नोव्हेंबर रोजी सर्वत्र महाराष्ट्र विधानसभा निवडणूका पार पडल्या आहेत. त्यानंतर २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. यासंदर्भात सकाळ समूहाचा एक्झिट पोल समोर आला आहे. ठाणे मतदारसंघातून भाजपाचं पारडं जड असल्याचं दिसत आहे आणि त्यामुळे येथे संजय केळकर यांना जास्तीत जास्त मत मिळण्याची शक्यता आहे.

ठाणे मतदारसंघामध्ये भाजपाकडून(BJP) संजय केळकर हे निवडणूक लढत आहेत. तर ठाकरे गटाकडून राजन विचारे हे निवडणूक लढत आहेत. या मतदारसंघात सकाळच्या एक्झिट पोलनुसार, संजय केळकर हे संभाव्य आमदार असू शकतात. राजन विचारे यांचा याठिकाणी पराभव होण्याची शक्यता आहे.

राजन विचारे माजी खासदार लोकसभेला पराभव झाले आहेत आणि आतादेखील विधानसभा निवडणुकीत पराभव होऊ शकतात असं दिसतंय. याच ठाणे मतदारसंघातून मनसेकडून अविनाश जाधव यांचं देखील तगडं आव्हान या संजय केळकरांच्या पुढे होतं.

परंतू, आता संजय केळकर या दोघांनाही मात करत संभाव्य आमदार होऊ शकतात. ठाणेकरांची पसंती संभाव्य आमदार म्हणून संजय केळकरांना मिळेल असं दिसतंय.

Buldhana : अतिवृष्टीमुळे शेती गेली खरडून; कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा कसा, शेतकऱ्याचा सरकारला प्रश्न

Maharashtra Live News Update: बार्शी तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

पुराच्या पाण्यातून घरात साप शिरला, सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू; सोलापुरमध्ये हळहळ

Thane Navratri: ठाण्यातील गरबाचे प्रसिद्ध ठिकाण; पाहा जत्रेचं अप्रतिम दृश्य

Sudden death in sleep: झोपेत अचानक मृत्यू होण्यामागची कारणं कोणती? धोका टाळण्यासाठी शरीरातील 'हे' बदल नक्की ओळखा

SCROLL FOR NEXT