Maharashtra Assembly Elections 2024:  Maharashtra Assembly Elections 2024:
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Politics : फॉर्म भरण्याआधी हायव्होल्टेज ड्रामा, सोलापुरात पवारांनी तर कोल्हापुरात काँग्रेसने उमेदवार बदलला

Maharashtra Assembly Elections 2024: काँग्रेसने कोल्हापूर तर राष्ट्रवादीने सोलापूरमध्ये उमेदवार बदलला

Namdeo Kumbhar

Maharashtra Vidhan Sabha Elections 2024: विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असतानाच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सोलापूरमधील उमेदवार बदललाय. त्याशिवाय काँग्रेसनेही कोल्हापूरमधील उमेदवार बदललाय. अवघे काही तास शिल्लक असताना उमेदवार बदलल्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलेय.

राष्ट्रवादीने सोलापूरमध्ये उमेदवार बदलला -

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून मोहोळमध्ये युवा सिद्धी कदम यांना उमेदवारी जाहीर केली होती. पण चार दिवसांच्या आत हा निर्णय मागे घ्यावा लागला. स्थानिक नेत्यांच्या विरोधांमध्ये शरद पवार यांनी उमेदवार बदलल्याच्या चर्चा आहे.

रमेश कदम यांची कन्या सिद्धी कदम यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाने उमेदवारी दिली होती. ती सोमवारी रात्री रद्द करण्यात आली आहे. सिद्धी यांच्या उमेदवारीला मोहोळमधील स्थानिक नेत्यांनी विरोध दर्शवला होता. नाराजी दूर करण्यासाठी आणि बंडखोरी टाळण्यासाठी राष्ट्रवादीने उमेदवारीमध्ये बदल केल्याची चर्चा आहे. सिद्धी कदम यांच्या ऐवजी मोहोळमधून राजू खरे यांना शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

राजू खरे यांना शरद पवार गटाची उमेदवारी

मोहोळमध्ये शिशसेना शिंदे गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मोठा धक्का दिला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचे निकटवर्तीय राजू खरे यांना मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाने उमेदवारी देऊन शिंदेना मोठा धक्का दिला आहे. शरद पवार पक्षाने सिध्दी रमेश कदम यांना उमेदवारी दिली होती. परंतु राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सिध्दी कदम यांच्या उमेदवारीला विरोध करत उमेदवार बदलण्याची मागणी केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सिद्ध रमेश कदम यांना दिलेला एबी रद्द करावा असे पत्र निवडणूक आयोगाला दिले आहे.

राजू खरे हे मोहोळ मतदार संघात मागील‌ वर्षभरापासून काम करत आहेत. त्यांनी निवडणूकीची जोरदार तयारी केली आहे. येथून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने आमदार यशवंत माने यांना पुन्हा संधी दिली आहे.

कोल्हापूरमध्ये काँग्रेसने उमेदवार बदलला -

काँग्रेसने कोल्हापूर उत्तर विधानसभेचा उमेदवार बदलला आहे. सोमवारी रात्री उशिरा काँग्रेसने कोल्हापूर उत्तर विधानसभेसाठी जाहीर केलेल्या राजेश लाटकर यांच्या ऐवजी मधुरिमाराजे छत्रपती यांच्या नावाची घोषणा केली आहे.

राजेश लाटकर यांना काँग्रेस मधील कार्यकर्ते आणि नेत्यांनी विरोध केल्याने काँग्रेसने उमेदवार बदलला आहे. राजेश लाटकर यांच्या ऐवजी मधुरिमाराजे छत्रपती कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

आज सकाळी साडेदहा वाजता शक्ती प्रदर्शन करत काँग्रेसच्या कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण आणि करवीर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांचा उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT