Devendra Fadnavis Saam Tv
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Assembly Election : तिकिटासाठी भाजपमध्ये धुसफुस वाढली, कार्यकर्ते अकोल्यात सामूहिक राजीनाम्याच्या तयारीत

Maharashtra Assembly Election 2024 : भाजप मुर्तीजापूरमधून आता नवीन चेहऱ्याला संधी देण्याची शक्यता आहे. त्यामुळं मुर्तीजापुर मतदारसंघात भाजपाचे पदाधिकारी आणि बूथ प्रमुख चांगलेच आक्रमक झाले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अकोल्यातून राजकीय क्षेत्रातील एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजप मुर्तीजापूरमधून आता नवीन चेहऱ्याला संधी देण्याची शक्यता आहे. त्यामुळं मुर्तीजापुर मतदारसंघात भाजपाचे पदाधिकारी आणि बूथ प्रमुख चांगलेच आक्रमक झाले. भाजपमध्ये मोठ्या संख्येने पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. हरीश पिंपळे यांना भाजपने उमेदवारी दिली नाही तर मतदारसंघातले 390 बुथ प्रमुख, शाखाप्रमुख पदाधिकारी एक साथ राजीनामा देणार, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिलाय.

हरीश पिंपळे यांच्या समर्थनात पुढच्या पूर मतदारसंघातले पदाधिकारी आणि बूथ प्रमुखांनी घोषणा दिल्या. मुर्तीजापुर मतदारसंघात आयात केलेला उमेदवार नको, बाहेरील उमेदवाराला संधी दिल्यास, आपण पक्षाचे काम करणार नाही आणि राजीनामा देणार, असा इशारा या पदाधिकाऱ्यांनी दिलाय.

मुर्तिजापूर मतदारसंघात रवी राठींऐवजी शरद पवार गटाने सम्राट डोंगरदिवेंना उमेदवारी़ दिली.. त्यामूळे रवी राठी नाराज होते, त्यांनी राष्ट्रवादीतून राजीनामा देत आपली नाराजी व्यक्त केली होती. आणि भाजपची वाट धरलीये. 2019 मध्ये रवी राठींनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर 42 हजार मते घेतली होती. महायुतीत मुर्तीजापुर मतदारसंघ हा भाजपच्या वाटेवर जात आहे, त्यामुळं भाजप मुर्तीजापूरमधून आता नवीन चेहऱ्याला संधी देण्याची शक्यता आहेय. विद्यमान आमदार हरीष पिंपळे यांचा पत्ता कट होणार?. असे चर्चा मतदारसंघात आहेत.

राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेश संघटन सचिव रवी राठींनी भाजपात प्रवेश केलाय. नागपुरात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला होता. मुर्तिजापूर मतदारसंघात रवी राठींऐवजी शरद पवार गटाने सम्राट डोंगरदिवेंना उमेदवारी़ दिली.. त्यामूळे रवी राठी नाराज होते, कालच त्यांनी राष्ट्रवादीतून राजीनामा देत आपली नाराजी व्यक्त केली होती. आणि भाजपची वाट धरलीये. 2019 मध्ये रवी राठींनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर 42 हजार मते घेतली होती. त्यामूळे भाजप मुर्तीजापूरमधून आता नवीन चेहऱ्याला संधी देण्याची शक्यता आहेय. कारण, मागील 2019 च्या निवडणुकीत विद्यमान आमदार हरीश मोजक्याच मतांनी विजयी झाला होता.. त्यामुळं पिंपळे यांचा पत्ता कट होणार?. अशाही चर्चा मुर्तीजापुर मतदारसंघ आणि भाजपात रंगल्या आहेत. तीन टर्म्स आमदार असलेल्या हरिश पिंपळेंचं नाव पहिल्या आणि दुसऱ्या यादीत नाहीये. त्यामुळं आता महायुतीच्या उमेदवाराकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. मुर्तीजापूरमध्ये महायुती, मविआ आणि वंचितमध्ये तिरंगी लढतीच चित्र आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: अब्दुल सत्तारांना पाडण्यासाठी ठाकरेंची भाजपला साद; ठाकरे आणि भाजपची युती?

Horoscope: जुन्या मित्रांची होईल भेट, जोडीदाराचा सुटेल अबोला; जाणून घ्या तुमची राशीत आहे काय?

Assembly Election: राज्यात जातीवर आधारित मतदान नाही; अजित पवारांच्या विधानाने महायुतीला टेन्शन

Horoscope : तुम्हाला अचानक… राशीत काय? चांगलं की वाईट?

India vs South Africa: वर्ल्ड चॅम्पियन्सचा नाद करायचा नाय! भारताचा द.आफ्रिकेवर मोठा विजय; ३-१ ने मालिका जिंकली

SCROLL FOR NEXT