Cm Eknath Shinde  Saam Tv
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Election : मुख्यमंत्री शिंदेंची सभा रद्द झाल्याने उमेदवाराचा रक्तदाब वाढला, थेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट

Maharashtra Vidhan Sabha Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा रद्द झाल्याने उमेदवाराचा रक्तदाब वाढल्याचा प्रकार समोर आलाय.

Namdeo Kumbhar

Maharashtra Assembly Elections 2024 Latest News : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडलाय. आपल्या पक्षातील सर्वोत्तम नेत्यानं आपल्यासाठी सभा घ्यावी अशी सर्वांची इच्छा असते. पण प्रत्येकवेळा ते शक्य होत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचारसभा रद्द झाल्याने शिवसेनेच्या उमेदवाराचा ब्लड प्रेशर वाढल्याचा प्रकार समोर आलाय. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे थेट रुग्णालयात दाखल झाले आहेत. श्रीरामपूर शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची श्रीरामपूरमधील सभा रद्द का झाली? याचं कारण अद्याप समोर आले नाही. पण त्याचा धसका उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांनी घेतला. त्यांचं ब्लड प्रेशर वाढलं. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्या श्रीरामपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

भाऊसाहेब कांबळे यांनी महायुीतमधील नेत्यावरच आरोप केला आहे. जिल्ह्यातील काही नेत्यांचा माझ्यावर दबाव आहे.

मला उमेदवारी देणारे हेच लोकं आणि मागे घ्यायला लावणारे हेच आहेत, अशी टीका भाऊसाहेब कांबळे यांची नाव न घेता राधाकृष्ण विखे पाटलांवर केी. पक्षाने मला एबी फॉर्म दिला.. त्यामुळे मी धनुष्यबाणावर लढणारच. माझ्या पक्षाच्या नेत्यांनी सांगितले असते तर मी माघार घेतली असती. सर्वसामान्य जनता माझ्यासोबत.. मी निवडणूक लढवणारच, असेही ते म्हणाले.

भाऊसाहेब कांबळे, माजी आमदार तथा उमेदवार शिवसेना शिंदे गट श्रीरामपूर विधानसभेत महायुतीतील दोन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून भाऊसाहेब कांबळे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून लहू कानडे यांना उमेदवारी मिळाली. दोन दिवसांपूर्वी लहू कानडे यांच्यासाठी राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी सभा घेतली. आज भाऊसाहेब कांबळे यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेचे नियोजन करण्यात आले होते. मात्र ऐनवेळी शिंदेंची सभा रद्द झाल्याने भाऊसाहेब कांबळे यांनी टेन्शन घेतले. त्यांच्यावर काल रात्रीपासून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दुसरीकडे श्रीरामपूरला लागून असलेल्या नेवासा मतदारसंघातील उमेदवारासाठी मुख्यमंत्र्यांची सभा झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

SCROLL FOR NEXT