महायुती आहे तर महाराष्ट्रात विकासाला गती आहे, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. महाराष्ट्रातील निवडणुकीत गैरमार्गातून कमावलेला पैसा काँग्रेसकडून वापरला जात आहे. काँग्रेसने कर्नाटकात घोटाळे केले असून त्या पैशांचा वापर निवडणुकीसाठी करत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला.
पंतप्रधान मोदी आज पुण्यातील उमेदवारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत बोलत होते. या सभेत त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. तसेच त्यांनी महायुतीची सत्ता महाराष्ट्रात स्थापन होईल असा विश्वास देखील व्यक्त केला. पुण्यातील विकासाठी महायुती सरकार काम करत असून तेथील अनेक प्रोजेक्ट सुरू असल्याचं देखील मोदी यावेळी म्हणाले.
पुण्याचा विकास करण्यासाठी गुंतवणूक, इंडस्ट्री आणि इन्फ्रास्ट्रक्चरची गरज असून महायुती ते वाढवत आहे. त्याच्यावर काम चालू आहे. परकीय गुंतवणुकीत देखील वाढ झाल्याचे देखील पंतप्रधान म्हणाले. यावेळी काँग्रेसवर त्यांनी हल्लाबोल केला. आधीच्या महाविकास आघाडीकडे सांगण्यासारखी कामे नाहीत. त्यांन अडीच वर्ष फक्त भाजपवर टीका करण्यात घालवली. त्यामुळे महाराष्ट्रात महायुती आहे तर विकासाला गती असल्याचं मोदी म्हणालेत.
आघाडीवर टीका करताना नरेंद्र मोदींनी म्हणाले, माझं आव्हान आहे, काँग्रेसच्या युवराज म्हणजेच राहुल गांधींच्या तोंडाचून बाळासाहेब ठाकरे यांचे कौतुक करावं. बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी राहुल गांधींनी चार चांगली वाक्य बोलून दाखवावी असं आव्हान मोदींनी आघाडीच्या नेत्यांना दिलं.
पुढे बोलताना मोदी म्हणाले, कर्नाटक निवडणुकीच्या वेळी काँग्रेसने तेथील जनतेला खूप आश्वासने दिली. पण सरकार आल्यानंतर त्यांनी हात वर केलेत. कामे न करता तेथील जनतेकडून लूट सुरू केल्याचा आरोपही मोदींनी केलाय. कर्नाटकात काँग्रेसचे रोज नवनवीन घोटाळे समोर येत आहेत. कर्नाटकातील घोटाळ्यांचे पैसेच महाराष्ट्रातील निवडणुकीत वापरले जात असल्याचा आरोपही पंतप्रधान मोदींनी केलाय.
काँग्रेस महाराष्ट्रात संविधानाचं कोरं पुस्तक वाटत आहे. त्याच काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकराचे संविधान काँग्रेसन संपूर्ण देशात लागू का केले नाही? जम्मू-काश्मीरमध्ये वेगळे संविधान होते आणि इतर देशात वेगळे. परंतु जेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हाच जम्मू काश्मीरमध्ये संविधान पोहोचले. मोदींनी ३७० कलम जमिनीत गाडून टाकले. मात्र आता काँग्रेस तेथे पुन्हा कलम ३७० लागू करण्याचा प्रयत्न करत आहे. ही भाषा पाकिस्तान बोलत असते, तिच भाषा आता काँग्रेसचे चट्टेबट्टे बोलत असल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केलाय.
यानंतर जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवणं हे चांगले झाले असं ज्या लोकांना वाटत आहे त्यांनी मोबाईलची टॉर्च लावावी. टॉर्च लावून कलम ३७० हटवण्याला समर्थन द्यावे असे आवाहन पंतप्रधान मोदींनी पुण्यातील सभेत केला. हजारो लोकांनी मोबाईलची टॉर्च लावत मोदींनी समर्थन दिलं.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.