Chief Minister Shinde Visit Guwahati  
Maharashtra Assembly Elections

CM Shinde: मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही, पण...,CM पदाबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान

CM Shinde: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान केलं. एका मुलाखतीत शिंदे म्हणाले, मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण मुख्यमंत्री हा महायुतीचा होईल.

Bharat Jadhav

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं वक्तव्य केलं. एका वाहिनीच्या मुलाखतीत बोलताना शिंदे म्हणाले, मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही. पण हेही निश्चित आहे की, पुढील मुख्यमंत्री हा महायुतीमधूनच होणार. हे विधान केल्यानंतर उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवरही जोरदार निशाणा साधला.

पक्ष फोडीवरून प्रश्नावर मुख्यमंत्री शिंदे 'फोडा आणि राज्य करा' हे काँग्रेसचे धोरण असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. राहुल गांधी बाळासाहेबांना हिंदुहृदयसम्राट कधी म्हणणार, असा सवालही त्यांनी केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की, आपल्या पक्षाचं काँग्रेस होऊ देणार नाही. परंतु उद्धव ठाकरे स्वत:च्या स्वार्थासाठी आणि मुख्यमंत्रिपद मिळावे म्हणून ते काँग्रेससोबत गेले. खुर्चीसाठी ते त्यांच्याकडे गेले. त्यांना वाटलं की, त्यांच्याशिवाय सरकार बनणार नाही, उद्धव ठाकरेंनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याची टीका ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या 'एक है तो सेफ है 'च्या घोषणेचंही समर्थन केलं. दरम्यान बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त राहुल गांधींनी अभिवादन केलं. याचे मुख्यमंत्री शिंदेंनी कौतुक केलं. परंतु त्यांच्या मनात शिवसेनेविषयी आधी काय भावना होती. पंतप्रधान मोदींनी आव्हान देऊपर्यंत राहुल गांधींनी स्वत: कधी बाळासाहेबांविषयी विधान केलं नव्हतं. पण हिंमत असेल तर त्यांनी बाळासाहेबांना हिंदुहृदयसम्राट म्हणावे?

उद्धव ठाकरेंबाबत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी उद्धव यांना जंगलात जाऊन वन्यप्राण्यांचे फोटो काढण्यास सांगितले असते. उद्धव यांच्याबाबत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, भाजपने आपल्याला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री बनवण्याचे आश्वासन दिले होते, पण त्यापूर्वीच ते मुख्यमंत्री झाले. २०१९ निवडणुकीचा निकाल लागला त्यानंतर उद्धव ठाकरेंनी संधीचा फायदा घेत महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT