Chagan Bhujbal LIVE Saam Tv
Maharashtra Assembly Elections

Chhagan Bhujbal : विकासासाठी सरकारमध्ये, आक्षेपार्ह दाव्यावर कारवाई करणार - छगन भुजबळ

Chhagan Bhujbal on Rajdeep Sardesai: राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात करण्यात आलेले दावे छगन भुजबळ यांनी खोडून काढलेत.

Namdeo Kumbhar

Chhagan Bhujbal : ते पुस्तक वाचणार आणि वकिलांनाही देणार आहे. निवडणुकीनंतर आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले. ईडीपासून वाचण्यासाठी भाजपसोबत गेल्याचा दावा, राजदीप सरदेसाई यांनी आपल्या पुस्तकात छगन भुजबळ यांनी सांगितल्याचा दावा केला होता. यावर आज छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत सर्व दावे फेटाळून लावले.

विकासासाठी सरकारसोबत गेलो आहे. मी कुठलीही मुलाखत दिलेली नाही. आक्षेपार्ह दाव्यावर कारवाई केली जाईल. निवडणुकीच्या काळातच पुस्तक का आले? असा सवालही छगन भुजबळ यांनी उपस्थित केला.

राजदीप सरदेसाई काय म्हणाले ?

लोकांनी ते पुस्तक वाचावं. पुस्तकात पूर्ण महाराष्ट्रात काय घटनाक्रम होता, त्याचं स्पष्टीकरण या पुस्तकात आहे. छगन भुजबळ यांनीही स्पष्टीकरण दिलेलं आहे. जनतेने पुस्तक वाचायला पाहिजे. पुस्तक वाचल्यानंतर त्यांना विचारा. राजकारणात मला काही रस नाही. पत्रकार लेखक म्हणून जी वस्तू स्थिती आहे मी ते लिहली. छगन भुजबळ माझ्यासोबत बोलत असताना अनेक लोक त्यांवेळी सोबत होते. यापेक्षा जास्त मला काही बोलायचं नाही. हे राजकारणाचे प्रश्न आहेत.

वस्तूस्थिती लोकांसमोर ठेवली - राजदीप सरदेसाई

राजकारण ज्यांना करायचा त्यांना करू द्या मी त्यात पडणार नाही. यात एक भाग महाराष्ट्रावर आहे. हे पुस्तक महाराष्ट्रावर नाही. मला भुजबळांबद्दल खूप आदर आहे. मी त्यांना अनेक वर्षांपासून ओळखतो. त्यावर काही म्हणायचं नाही हे पुस्तक वाचा.

त्यात कुठल्याही पक्षाचा काही नाही. ज्या ज्या लोकांचं मत होतं हे मत इथे मांडलेलं आहे. छगन भुजबळ यासह अनेक विषयावर बोलले. पुस्तकाचा एक पॅरेग्राफ घेऊ नका. एका पॅरेग्राफवर राजकारण होतं पूर्ण पुस्तक वाचा. पुस्तकांचा टाइमिंग काहीच नाही. 2014, 2019 आणि 2024 मी नोव्हेंबर महिन्यात पुस्तक लिहिलेले आहे. याचा आणि निवडणुकीचा टाइमिंगच्या काहीही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Vijay Melava: संपूर्ण लाईट बंद... इकडून उद्धव, तिकडून राज, ठाकरे बंधूंची ग्रँड एंट्रीने वरळी डोम दणाणला|VIDEO

Raj-Uddhav Thackeray Video: सुवर्णक्षण! हाच तो क्षण, ज्याची लाखो कार्यकर्ते वाट पाहत होती, पाहा व्हिडिओ

Rice Cooking Tips: भात पातेल्यात शिजवावा की कुकरमध्ये? वाचा फायदे-तोटे

Marathi bhasha Vijay Live Updates : कोणाची माय व्यायली त्यांनी मुंबईला हात लावून दाखवावा - राज ठाकरेंचा इशारा

Karnataka Hill Station: ट्रेकिंग अन् नयनरम्य दृश्य! कर्नाटकातील 'या' हिल स्टेशनला नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT