Jharkhand Election Result yandex
Maharashtra Assembly Elections

Jharkhand Election Result: झारखंडमध्ये भाजपला धक्का, इंडिया आघाडीनं बहुमत गाठलं, कुणाला किती जागांवर आघाडी?

Jharkhand Election Result: झारखंड विधानसभा निवडणुकीचे निकाल आज येणार आहे. मतमोजणीला सुरुवात झालेली आहे.

Dhanshri Shintre

झारखंड विधानसभा निवडणुकीचे निकाल आज येणार आहे. मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. सर्व प्रथम पोस्टल मतांची मोजणी केली जात आहे. त्यानंतर ईव्हीएममध्ये टाकलेल्या मतांची मोजणी केली जाईल. मतमोजणी स्थळी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. झारखंडमध्ये यावेळी दोन टप्प्यात निवडणुका झाल्या. पहिला टप्पा १३ नोव्हेंबर आणि दुसरा टप्पा २० नोव्हेंबरला पार पडला. यावेळी राज्यात कोणाचे सरकार येणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी मतमोजणी सुरू आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गज उमेदवारांनी आपले नशीब आजमावले आहे. ज्यात हेमंत सोरेन, कल्पना सोरेन, बाबूलाल मरांडी, जयराम महतो, सरयू राय, सीपी सिंग, अजॉय कुमार, सीता सोरेन, प्रदीप यादव, चंपाई सोरेन, हफिजुल अन्सारी, रवींद्र नाथ महतो, सुदेश महातो यांचा समावेश आहे.

झारखंड विधानसभेच्या ८१ जागांसाठी दोन टप्प्यात मतदान झाले. पहिल्या टप्प्यात १३ नोव्हेंबरला ४३ जागांसाठी मतदान झाले होते. ज्यामध्ये एकूण ६६.६५ टक्के मतदान झाले होते, तर २० नोव्हेंबरला दुसऱ्या टप्प्यात ३८ जागांवर मतदान झाले होते, ज्यामध्ये ६८.९५ टक्के मतदान झाले होते. यावेळी झारखंडमध्ये ६७ टक्क्यांहून अधिक मतदान झाले. हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली झारखंडमध्ये गेली पाच वर्षे इंडिया आघाडीचे सरकार होते.

झारखंड विधानसभा निवडणुकीचे निकाल आज येत आहेत. दुपारी एक वाजेपर्यंत अनेक जागांचे चित्र स्पष्ट होईल, तर सर्व जागांचे निकाल सायंकाळी उशिरापर्यंत लागण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत महिलांनी भरघोस मतदान केले आहे. निकाल कोणाच्या बाजूने लागेल हे पाहणे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup: नेदरलँड्सने वाढवली होती धडधड; टीम इंडियाचं गचाळ क्षेत्ररक्षण तरीही भारताचा रोमांचक विजय

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT