Maharashtra Assembly Elections

Assembly Election: बल्लारपूरमध्ये रंगणार तिरंगी लढत; सुधीर मुनगंटीवारांपुढे काँग्रेसच्या संतोष सिंह रावतांचं आव्हान

Assembly Election: राज्यातील हाय होल्टेज लढतींपैकी एक असलेल्या बल्लारपूरमध्ये भाजपने लोकसभेला पराभूत झालेल्या मुनगंटीवारांना रिंगणात उतरवलंय. तर काँग्रेसने रावतांना संधी दिल्याने अभिलाषा गावतुरेंनी बंडखोरी केलीय. त्यामुळे बल्लारपूरमध्ये महाभारत रंगलंय.. त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट..

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहोळकर, साम प्रतिनिधी

राज्यातील लक्षवेधी लढतींपैकी एक असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूरमध्ये भाजपने माजी मंत्री सुधीर मुनगंटीवारांना सातव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय.. तर काँग्रेसने संतोष सिंह रावतांना संधी दिलीय..त्यामुळे काँग्रेसच्या अभिलाषा गावतुरेंनी बंडांचं निशाण फडकवलंय..मात्र काँग्रेसचे उमेदवार संतोष सिंह रावतांनी बल्लारपूरमध्ये परिवर्तनाची गरज असल्याचं वक्तव्य केलंय. तर मुनगंटीवारांनी कामांची यादीच सांगत विजयाचा विश्वास व्यक्त केलाय.

1995 मध्ये चंद्रपूरमधून रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी झालेल्या मुनगंटीवारांना सलग 6 निवडणुकीत विजय मिळाला. त्यांनी वनमंत्रिपदासह महत्वाची मंत्रिपदं साभांळली आहेत. मात्र लोकसभा निवडणूकीत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून प्रतिभा धारोनरकरांनी मुनगंटीवारांचा पराभव केला. त्यामुळे विधानसभेबाबत उत्सुकता ताणली गेलीय. 2019 च्या विधानसभेतील मतांचं समीकरण नेमकं कसं होतं? पाहूयात.

2019 मधील मतांचं गणित

सुधीर मुनगंटीवार, भाजप, 86 हजार 2 मतं

डॉ. विश्वास जाडे, काँग्रेस, 52 हजार 762 मतं

राजू झोडे, वंचित, 39 हजार 958 मतं

33 हजार 240 मतांनी मुनगंटीवारांचा विजय

2009 मध्ये पुनर्रचना झालेल्या बल्लारपूरचं जातीय समीकरण कसं आहे? पाहूयात.

बल्लारपूरचं जातीय समीकरण

माळी - 45 हजार

तेली - 40 हजार

एससी- 45 हजार

एसटी - 40 हजार

कुणबी (खैरे) - 32 हजार

कुणबी (धानोजे) - 18 हजार

मुस्लीम - 18 हजार

लोकसभा निवडणुकीत मुनगंटीवारांचा पराभव झाल्याने काँग्रेसने चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावतांना उमेदवारी दिलीय. रावत हे वडेट्टीवारांच्या गटातील असल्याने धानोरकर गटाच्या गावतुरेंनी बंडखोरी केलीय. त्यामुळे काँग्रेसच्या मतांची फूट मुनगंटीवारांना विजयापर्यंत पोहचवणार की लोकसभेनंतर मुनगंटीवारांची पराभवाची मालिका सुरुच राहणार? याकडे लक्ष लागलंय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वाशिमच्या रेल्वे स्टेशन परिसरात अज्ञात महिलेच्या डोक्यावर दगड घालून हत्या

KTM RC 160: धूम मचाले धूम..! ताशी ११८ किमीच्या स्पीडनं बाईक धावेल सुसाट; KTM RC 160च्या फीचससह लुक आहे खास

Marine Drive police rescue: जिवाची बाजी लावून पोलिसांनी केलं रेस्क्यू; महिलेला मृत्यूच्या दाढेतून काढलं बाहेर, Video सोशल मीडियावर व्हायरल

Rajya Sabha Election: राजकारण तापलं! ५ जागांसाठी महाआघाडीत बिघाडी; NDAमध्येही हालचालींना वेग

'स्पीडब्रेकर' आघाडी पुन्हा मायानगरी मुंबईच्या विकासाला कायमचे 'ग्रहण' लावणार!

SCROLL FOR NEXT