Ajit Pawar  Saamtv file photo
Maharashtra Assembly Elections

Maharashtra politics : बारामतीची सुभेदारी कोणाकडे? मुलीनंतर नातवासाठी पवारांची फिल्डिंग, उद्विग्न दादांचा काकांना सवाल

Maharashtra Election News : बारामतीच्या लढतीकडे राज्याचे लक्ष लागलेय. अजित पवारांच्या विरोधात शरद पवार मैदानात उतरले आहेत.

Tanmay Tillu

Maharashtra Assembly elections 2024: बातमी अजितदादांनी केलेल्या एका वक्तव्याची... लोकसभेला पवारांची शेवटची निवडणूक असल्याचं सांगितलं जातं होतं आणि आताही शेवटचीच म्हटलं जातंय. त्यामुळे आता नातवाकडे लक्ष द्या असं बोललं जातंय. मात्र मी पुतण्या असलो तरी मुलासारखाच असल्याचं दादांनी म्हटलंय. (ajit pawar vs sharad pawar)

राज्यात प्रचारानं वातावरण तापलंय.त्यात बारामतीचं राजकारणही ढवळून निघालं आहे. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीवर विशेष लक्ष केंद्रीत केलंय. युगेंद्र पवार यांना निवडून आणण्यासाठी पवार कुटुंब मतदारसंघात उतरलंय.. यावेळी मतदारांना भावनिक आवाहन केलं जातंय. या आवाहनामुळे अजित पवार मात्र उद्विग्न झालेत. आधी मुलीकडे लक्ष द्या आणि आता मुलगा सोडून थेट नातवाकडे लक्ष द्या असं सांगताना माझं काय चुकलं असा सवालही त्यांनी केला. तर सुप्रिया सुळेंनी यावर तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली.

लोकसभा निवडणुकीपासून बारामतीत पवार विरुद्ध पवार सामना सुरुए. या सामन्यात शरद पवारांनी सुप्रिया सुळेंच्या विजयानं आघाडी घेतलीये. आता पुन्हा विधानसभेत पवार विरुद्ध पवार सामना रंगतोय. मात्र यावेळी पवारांनी संसदीय राजकारणातून निवृत्तीचे संकेत देताच बारामतीच्या सुभेदारीवरून राजकारण पेटलंय. त्यामुळे लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही शरद पवारांच्या आवाहनाला बारामतीकर प्रतिसाद देणार की परंपरेप्रमाणेच आपला लोकप्रतिनिधी निवडणार याबाबत उत्सुकता लागलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Operation Tiger: आम्ही ऑपरेशन अर्धवट ठेवत नाही, लवकरच ब्रेकिंग न्यूज मिळेल; एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

'मी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतलाय!; ओमराजे निंबाळकरांनी सांगितली ठाकरे गट सोडण्याची कारणं

NEET Student: 'मला माफ करा...' नीटच्या आणखी एका विद्यार्थिनीची आत्महत्या, मृतदेह पाहून कुटुंबीय हादरले

Chhatrapati Sambhajinagar : पावसाळ्यातील स्वर्ग! 200 फूट उंचीवरून कोसळणारा संभाजीनगरचा धबधबा पर्यटकांना घालतो भुरळ

महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा मिळणार,अधिवेशनात 10 विधेयके मांडणार: मुख्यमंत्री

SCROLL FOR NEXT