will kiran samant candidate in ratnagiri sindhudurg constituency answers deepak kesarkar saam tv
लोकसभा २०२४

Ratnagiri Sindhudurg Constituency: रत्नागिरी सिंधुदुर्गात किरण सामंतांचे पारडे जड, उमेदवारीवरुन दीपक केसरकर स्पष्टच बाेलले (Video)

शिवसेनेची आणि भाजपची या लोकसभा मतदारसंघात मोठी ताकद आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपने या मतदारसंघावर दोघांनी दावा केला आहे. त्यामुळे उमेदवारी नेमकी काेणाला मिळणार याची उत्सुकता मतदारांना आहे.

Siddharth Latkar

- विनायक वंजारे

Ratnagiri Sindhudurg Constituency :

किरण सामंत (kiran samant) हे तरुण आणि उगवतं नेतृत्व आहे. त्यामुळे त्यांना जर लोकसभेची उमेदवारी मिळाली तर ते खूप जोमाने काम करू शकतील. परंतु त्यांना उमेदवारी मिळणार की नाही हे मी आता सांगू शकत नाही. पण त्यांना उमेदवारी मिळावं अशी आम्ही मागणी आणि प्रार्थना करतो. त्यांना उमेदवारी मिळाली नाही, तरी ते जो उमेदवार असेल त्याचं निष्ठेने काम करतील असा विश्वास मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

केसरकर पुढं बाेलताना म्हणाले रत्नागिरी जिल्ह्यातील विधानसभेच्या शिवसेनेच्या वाट्याला ज्या जागा येतील तेथे एखाद्या जागेवर ते जोमाने लढतील आणि मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. त्यामुळे तरुण आणि उगवतं नेतृत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघत आहोत. असहे किरण सामंत यांच्या समाज माध्यमात ठेवलेल्या स्टेटसवर दीपक केसरकर यांनी नमूद केले.

दाेन्ही पक्षाची मतदासंघात माेठी ताकद

जेव्हा दोन्ही पक्षाची समसमान ताकद असते तेव्हा दोन्ही पक्ष या जागेसाठी दावा करत असतात. शिवसेनेची आणि भाजपची या लोकसभा मतदारसंघात मोठी ताकद आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपने या मतदारसंघावर दोघांनी दावा केला आहे असे केसरकर यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेची उमेदवार विनायक राऊत (vinayak raut) होते. ते शिवसेने सोबत आले नाही, ते ठाकरे गटा सोबत राहिले. त्यामुळे शिवसेनेने ही जागा मागितली होती. त्याचवेळी भाजपने या मतदारसंघावर दावा केला कारण नारायण राणे (narayan rane) यांनी या मतदारसंघावर दावा केला होता. त्यामुळे शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी महायुतीचे वरिष्ठ नेते यावर निर्णय घेतील आणि जो उमेदवार असेल त्याला आम्ही निवडून आणू असेही दिपक केसरकर यांनी स्पष्ट केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

SCROLL FOR NEXT