Prashant Kishor Maharashtra Lok Sabha Prediction Saam Tv
लोकसभा २०२४

Maharashtra Lok Sabha: महाराष्ट्रात जागा कमी, तरी सत्तेची हमी; प्रशांत किशोर यांनी केली मोठी भविष्यवाणी

Prashant Kishor: प्रसिद्ध राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत काही भाकीतं वर्तवलं आहे. किशोर यांनी गेल्या अनेक निवडणुकांबाबत अंदाज वर्तवले आहेत आणि ते बहुतांशी खरे ठरले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

विनोद पाटील, साम टीव्ही प्रतिनिधी

प्रसिद्ध राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत काही भाकीतं वर्तवलं आहे. किशोर यांनी गेल्या अनेक निवडणुकांबाबत अंदाज वर्तवले आहेत आणि ते बहुतांशी खरे ठरले आहेत. त्यामुळे त्यांच्या या भाकिताबाबतही मोठी चर्चा रंगलीय. त्यांनी देशातल्या सत्तेच्या समीकरणावर वर्तवलेलं भाकीत केलं आहे.

पीकेंची भविष्यवाणी

लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून 400 पारचा नारा दिला जात आहे. पण प्रत्यक्षात भाजपाला 300 जागा मिळतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात राग नाही. मात्र भाजपाला स्वबळावर 370 जागा मिळणं अशक्य आहे. त्यांना जवळपास 300 जागा मिळतील मात्र 270 च्या खाली सुद्धा जाणार नाहीत”, असं भाकीत प्रशांत किशोर यांनी वर्तवलंय.

प्रशांत किशोर यांनी अनेक पक्षांसाठी विधानसभा, लोकसभेला राजकीय व्युहरचना आखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या निकालांबाबतही अंदाज व्यक्त केले आहेत. राज्यातील स्थितीबाबतही किशोर यांनी भाकीत केलं आहे.

'महाराष्ट्रात जागा कमी, तरी सत्तेची हमी'

''महाराष्ट्रात 20 ते 25 जागा जिंकू असा विश्वास मविआला आहे. मविआनं 25 जागा जिंकल्या तरी भाजपचं काहीही नुकसान होणार नसल्याचं किशोर यांचं म्हणणंय. सध्या महाराष्ट्रात 48 पैकी केवळ 23 जागा भाजपकडे आहेत. अशा स्थितीत विरोध वाढूनही भाजपचे नुकसान नाही'', असं प्रशांत किशोर म्हणाले आहेत.

देशातील लोकसभा निवडणुका शेवटच्या टप्प्यात पोहचल्या आहेत. भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडीमध्ये मुख्य सामना आहे. आतापर्यंत झालेल्या मतदानानंतर दोन्ही बाजूकडून विजयाचे दावे-प्रतिदावे करण्यात येतायत. त्यामुळे प्रशांत किशोर यांनी केलेली राजकीय भविष्यवाणी कितपत खरी ठरते याची उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hemant Dhome: मराठी सक्ती विरोधातील आंदोलनावरून प्रसिद्ध अभिनेता भडकला; परप्रांतीय रिक्षाचालकांना दिला मोठा इशारा

Mansi Naik Dance Video: 'मेरे सपनो के राजा' गाण्यावर मानसी नाईकने केला डान्स, व्हिडीओ व्हायरल

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आठव्या वेतन आयोगात मिळणार १० ते १६ लाखांचा एरियर

Maharashtra News Live Update: पुणे जिल्ह्यासाठी पावसाचा येलो अलर्ट

Vande Bharat Train: मुंबईवरून बंगळुरूला जा सुसाट, वंदे भारत स्लीपर ट्रेन धावणार; मुंबईतून किती वाजता सुटणार अन् तिकीट किती?

SCROLL FOR NEXT