Vishal Patil
Vishal Patil Saam Tv
लोकसभा २०२४

Sangli Lok Sabha: सांगलीत मविआची डोकेदुखी वाढली, सांगलीतून विशाल पाटलांची माघार नाहीच; मनधरणीचे प्रयत्न फोल

साम टिव्ही ब्युरो

Vishal Patil News:

सांगलीत विशाल पाटलांनी बंड कायम ठेवल्यामुळे आता सांगलीत तिरंगी लढत होणार आहे. कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाही, असा विश्वास विशाल पाटलांनी कार्यकर्त्यांना दिलाय. त्यामुळे महाविकास आघाडीची अडचण चांगलीच वाढलीय.

काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी आपलं बंड कायम ठेवलंय. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाहीये. त्यामुळे मविआच्या अडचणीत चांगलीच वाढ झालीय. शेवटच्या क्षणी विधानपरिषद किंवा राज्यसभा सदस्यत्वाची ऑफर स्वीकारून ते आपलं बंड मागे घेऊ शकतात अशी चर्चा होती. मात्र विशाल पाटलांनी माघार न घेतल्यामुळे आता सांगलीच्या रिंगणात तीन पाटलांची लढत होणार आहे..

दरम्यान, विशाल पाटलांना लिफाफा चिन्ह मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं.. विशाल पाटलांच्या बंडखोरीमुळे ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटलांची मत विभागली जाणार आहेत.

'मशाल' विरूद्ध विशाल

2019च्या निवडणुकीत विशाल पाटलांनी स्वाभिमानी संघटनेच्या तिकिटावर निवडणूक लढली होती. यावेळी विशाल पाटलांना 3 लाख 44 हजार 643 मतं मिळवली होती. वंचितच्या तिकीटावर गोपींचद पडळकर यांना मिळालेली 3 लाख मतं निर्णायक ठरली होती.

मविआने एकच उमेदवार दिला असता भाजपला ही निवडणूक सोपी नव्हती. मात्र विशाल पाटलांमुळे मतविभागणीचा फटका काँग्रेसला बसणार आहे. महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील, भाजपकडून खासदार संजय काका पाटील, आणि अपक्ष म्हणून काँग्रेसचे विशाल पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. विशाल पाटील यांचे मन वळवण्यात काँग्रेस नेत्यांना अपयश आलंय. त्यामुळे सांगलीच्या लढतीचे पडसाद इतर मतदारसंघात उमटणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

Indian Politics 2024 : भाजप झाला मोठा संघ झाला छोटा;'आधी RSS ची गरज, आता भाजप सक्षम'

Crime News: युट्यूब पाहून छापल्या लाखोंच्या बनावट नोटा; 9 वी पास तरुणाचा कारनामा

Maharashtra Politics: 'नावं द्या त्या पोलिसांना बघतो मी', उद्धव ठाकरेंनी भरला पोलिसांना दम; मुलुंडच्या राड्यावरून ठाकरेंचा संतापले

Kalyan Crime News : यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीवर ज्वलनशील पदार्थ लुटलं, कल्याणमधील घटनेने खळबळ

SCROLL FOR NEXT