uddhav thackeray assures sambhaji brigade on buldhana and hingoli lok sabha constituency Saam TV
लोकसभा २०२४

Maharashtra Election 2024 : बुलढाणा, हिंगाेली लाेकसभा मतदारसंघात संभाजी ब्रिगेड लढणार; उद्धव ठाकरेंनी दिले आश्वासन

Uddhav Thackeray News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. संभाजी ब्रिगेडने 2 मतदारसंघाची मागणी केल्याची माहिती भानुसे यांनी दिली.

Siddharth Latkar

- रामनाथ ढाकणे

Chhatrapati Sambhajinagar News :

बुलढाणा (buldhana lok sabha constituency) आणि हिंगाेली लाेकसभा मतदारसंघ (hingoli lok sabha constituency) संभाजी ब्रिगेडला (sambhaji brigade) देण्याचा विचार असल्याचे आश्वासन आज (बुधवार) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray latest marathi news) यांनी दिले आहेत. हे दाेन्ही मतदारसंघ आम्हांला मिळतील असा विश्वास संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते शिवानंद भानुसे (shivanand bhanuse) यांनी ठाकरेंच्या भेटीनंतर साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केला. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

लोकसभा निवडणुकीच्या (lok sabha election 2024) पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. संभाजी ब्रिगेडने महाविकास आघाडीमधील शिवसेनेच्या कोट्यातून 2 मतदारसंघाची मागणी केल्याची माहिती भानुसे यांनी दिली.

भानुसे म्हणाले बुलढाणा आणि हिंगोली या मतदार संघामधून संभाजी ब्रिगेड लोकसभा निवडणुक लढवण्यास आग्रही आहे. आज आम्ही ठाकरेंसमवेत चर्चा केली. ठाकरे यांनी आम्हांला या संदर्भात सकारात्मकाता दाखवली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

संभाजी ब्रिगेडला दोन्ही मतदारसंघ देण्याचा आमचा विचार असल्याचे ठाकरेंनी आश्वासित केले आहे असे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते शिवानंद भानुसे यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

SCROLL FOR NEXT