Uddhav Thackeray On Election Commission Saam Tv
लोकसभा २०२४

Uddhav Thackeray: पहाटे 5 वाजले तरी मतदान करा, रांगेतून हटू नका; उद्धव ठाकरे यांचं मतदारांना आवाहन

Lok Sabha Election 2024: एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी राज्यातील 13 जागांवर मतदान सुरु असताना उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत.

Satish Kengar

एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी राज्यातील 13 जागांवर मतदान सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले आहेत की, ''मतदान केंद्रावर दिरंगाई सुरु आहे. मतदान केंद्रात गेल्यावर मतदारांना तुमचं नाव काय? तुमच्या भावाचं नाव काय, असं म्हणत वेळ घेतला जात आहे. मतदारांना केंद्रात फोन आणू नका सांगितलं जात आहे. हे आधीच मतदारांना सांगायला हवं होतं''

निवडणूक आयोगाकडून पक्षपातीपणा सुरू, असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. यावेळी त्यांनी मतदारांना मतदान केंद्रातून मतदान केल्याशिवाय बाहेर पडू नका, असं आवाहन केलं आहे.

'सकाळी पाच वाजले तरी मतदान केल्याशिवाय मतदान केंद्र बंद करता येणार नाही'

निवडणूक आयोग आणि मोदी सरकारवर आरोप करत उद्धव ठाकरे म्हणाले की, ''मशिन बंद पाडले जातात. अधिकारी विलंब करतायेत. हा मोदी सरकारचा डाव आहे. ते पराभवाच्या भीतीने पछाडले आहेत. लोक उत्साहाने बाहेर पडले आहेत. त्यांना जाणूनबुजून त्रास दिला जात आहे. हा निवडणूक आयोगाकडून खेळला जाणारा खेळ आहे.''

ते म्हणाले, ''जिथे आमचा टक्का अधिक होणार आहे, तिथे मतदान कमी होतंय. विलंब होतोय. मी मतदारांना विनंती करतो की, सकाळी पाच वाजले तरी मतदान केल्याशिवाय मतदान केंद्र बंद करता येणार नाही.''

ठाकरे म्हणाले, मतदारांत खूप उत्साह. पण निवडणूक आयोग पक्षपातीपणा करतोय. दिरंगाई केली जातंय. विशिष्ट वस्त्यांमध्ये वारंवार ओळखपत्र विचारले जातंय. मोदी सरकार पराभवाच्या भितीने निवडणूक आयोगाचा वापर घरगड्यासारखा करत आहे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Job: कोणत्याही परिक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी; RITES मध्ये भरती सुरु; पगार ४६०००, जाणून घ्या सविस्तर

65 वर्षे जुना कायदा बदलण्याच्या तयारीत मोदी सरकार, खासदार अपात्रता कायद्याच्या जागी नवीन कायदा आणण्याची केंद्राची योजना

Maharashtra News Live Updates: पुणे शहरासह जिल्ह्यात आज अनेक नेत्यांच्या सभा

Shani Margi 2024: शनी देव कुंभ राशीत मार्गस्थ; 'या' राशींसमोर संकटं येणार, आर्थिक घडी विस्कटणार

Ayushman Bharat Yojana: ५ लाखांपर्यंत मोफत उपचार, कोणत्या हॉस्पिटलमध्ये घेता येणार उपचार; पाहा लिस्ट

SCROLL FOR NEXT