PM Modi on Sonia Gandhi: Saam Tv
लोकसभा २०२४

PM Modi: 'जे जिंकू शकत नाही, त्यांनी मैदान सोडलं', PM मोदींनी सोनिया गांधींना केलं लक्ष्य

PM Modi on Sonia Gandhi: जे निवडणूक जिंकू शकत नाहीत, ते राज्यसभेतून संसदेत पोहोचतात, टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे नाव न घेता लगावला आहे.

साम टिव्ही ब्युरो

PM Modi on Sonia Gandhi:

जे निवडणूक जिंकू शकत नाहीत, ते राज्यसभेतून संसदेत पोहोचतात, टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे नाव न घेता लगावला आहे. राजस्थानमधील जालोर येथे प्रचार सभेला संबोधित करताना ते असं म्हणाले आहेत.

मोदी म्हणाले की, काँग्रेसने सर्वातआधी दक्षिणेतील नेत्याला (केसी वेणुगोपाल) राजस्थानमधून राज्यसभेवर पाठवले. त्यानंतर मनमोहन सिंह यांना येथून राज्यसभेवर पाठवण्यात आले आणि आता पुन्हा येथून एका नेत्याला (सोनिया गांधी) राज्यसभेवर पाठवण्यात आले.

नरेंद्र मोदी म्हणाले की, जे निवडणूक लढवू शकत नाहीत आणि जिंकू शकत नाहीत, ते राज्यसभेतून संसदेत पोहोचतात. एकेकाळी 400 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला आज 300 उमेदवारही मिळत नाही. काँग्रेस आपल्या कृत्याची शिक्षा भोगत असल्याचे मोदी म्हणाले. आज परिस्थिती अशी आहे की, जे पक्ष आपापल्या राज्यात 25 टक्केही जागा द्यायला तयार नाहीत, त्यांच्यासोबत काँग्रेसला आघाडी करावी लागत आहे.

याआधी शनिवारी महाराष्ट्रात एका प्रचार सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले होते की, 2019 मध्ये अमेठीमधून निवडणूक हरल्यानंतर राहुल गांधी वायनाडला आले आणि यावेळी त्यांना वायनाडमधूनही पळून जावे लागेल. काँग्रेसचे राजपुत्र 26 एप्रिलच्या मतदानाची वाट पाहत आहेत. त्यानंतर ते आणि त्याची टोळी सुरक्षित जागा शोधणार आहे.

दरम्यान, राजस्थानमधून राज्यसभेत पोहोचलेल्या सोनिया गांधी यांनी उत्तर प्रदेशची रायबरेली लोकसभा मतदारसंघ सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र या जागेसाठी काँग्रेसने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची पुणे महापालिकेत बैठक

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

9 IPS अधिकाऱ्यांच्या मध्यरात्री बदल्या; पोलिस दलात खळबळ, कोणाची कुठे नियुक्ती?

Pune Politics: ज्येष्ठ नेत्यांवर टीका, भाजपच्या जिव्हारी, पुणे महापालिकेतील निधी रोखल्याचा विषय मुख्यमंत्र्यांच्या दरबारी

SCROLL FOR NEXT